जळगाव,दि.11- कोर्ट चौकातील वायरलेस मोबाईल या दुकानातून चोरी झालेल्या 14 लाख 19 हजार 932 रुपयाच्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात जिल्हा पेठ पोलिसांनी अटक केलेल्या बिहारमधील तिन्ही संशयितांना गुरुवारी न्यायालयाने 16 मे र्पयत पोलीस कोठडी सुनावली.
हे तिन्ही संशयित इतर राज्यात चोरी करुन तो मुद्देमाल विदेशात पाठवत असल्याचे उघड झाले आहे. समीर शहा मुस्तफा देवान (वय 28 रा.पकोईटोला, ता.छोडादानी जि.मोतीहरी, बिहार), मिंटूकुमार देविकांत ठाकूर (वय 22 रा.बिसपुर,ता.छोडादानी जि.मोतीहरी, बिहार) व अब्दुल कदीर इस्लाम देवान (वय 28 रा.छोडादानी जि.मोतीहरी, बिहार) या तिघांना जिल्हा पेठ पोलिसांनी औरंगाबाद येथील कारागृहातून जळगावच्या गुन्ह्यात वर्ग केले.
अटक केलेले तिन्ही गुन्हेगार हे आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्य आहेत. वेगवेगळ्या राज्यात चोरी करुन तो माल विदेशात विक्री करीत असल्याचे उघड झाले आहे. जळगावातील 108 मोबाईलचा डम डाटा तपासला असता ते मोबाईल नेपाळमध्ये अॅक्टीवेट झाल्याचे निष्पन्न झाले आहे.