जळगाव : शहरातील महिला अधिकाºयाचा विनयभंग केल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता (रा़ शिवाजीनगर) यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकून त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संगनमत करीत पुरविले कागदपत्रेसदर महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, शिवाजीनगर वास्तव्यास असलेले दीपककुमार गुप्ता हे त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर महिलेबाबत बदनामीकारक पोस्ट टाकत होते़ तसेच त्रास देण्याच्या उद्देशाने काहींनी त्यांच्याविरूध्द तक्रार अर्ज केले होते़ मात्र, माहिती अधिकार कायद्यातंर्गत प्रशासकीय सेवेतील आपल्या काही हितशत्रुंनी गुप्ता यांच्याशी संगनमत करून ती कागदपत्रे त्यांना पुरविली़ नंतर बदनामी करण्याच्या उद्देशाने गुप्ता यांनी ती सोशल मीडियावर टाकली़खंडणी मागण्याचा प्रयत्न२१ जुलै रोजी सायंकाळी महिला कार्यालयात असताना दुसºया इमसाच्या माध्यमातून खंडणी मागण्याचा प्रयत्न गुप्ता यांनी केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.वृद्ध आई-वडिलांना मानसिक धक्काया फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, आपले ८० वर्षीय आई वडिल हे जिल्हयात राहतात.या प्रकारामुळे त्यांना मानसिक धक्का बसून त्यांचे काही झाल्यास त्याची जबाबदारी गुप्ता यांची असेल. तसेच काहीही काम नसताना गुप्ता आपल्या कार्यालयात येत असतात. त्यामुळे हा एक प्रकारे दबाब टाकण्याचा प्रकार आहे.गुप्ता यांना चुकीची माहिती पुरविणाºया तसेच त्यांच्या सोशल मिडीयावरील पोस्टला लाईक व शेअर करणाºया इसमांविरुद्धही आपली फिर्याद आहे.त्यांच्यावरही कारवाईची मागणी या या फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे.आपण शहरात एकटे राहतो. त्यामुळे स्वत:च्या सुरक्षिततेसाठी सुरुवातीला तक्रार दिली नाही. त्याचा गुप्ता यांनी गैरफायदा घेतला आणि कागदपत्रे मिळविली. ती कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल करून माझी बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.फेसबुकवर बदनामीकारक पोस्टगुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर महिला अधिकाºयाबाबत बदनामीकारक पोस्ट टाकली. त्यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून गुप्ता यांच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक भीमराव नांदुरकर हे करीत आहेत़यापूर्वी दाखल गुन्ह्णांचेही दिले दस्ताऐवजदीपक गुप्ता यांच्याविरूध्द नाशिक, पुणे, विलेपार्ले धुळे, जळगाव शहर तसेच सीबीडी मुंबई याठिकाणी असलेलेल्या गुन्ह्णांचे दस्ताऐवजाच्या झेरॉक्स प्रतीसुध्दा महिलेने पोलिसांना तक्रारीसोबत दिल्या आहेत.महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे वाळूमाफीयांशी संगनमत आहे. आपण याविरुद्ध आवाज उठविल्याने पुन्हा एकदा आपल्यावर खोटा फिर्याद देण्यात आली आहे.- दीपककुमार गुप्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता.