ठळक मुद्दे तफावत आढळून आल्याने गुन्हे महावितरण कंपनीतर्फे गुन्हे दाखल संबंधित मीटर रिडींग एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 30 - वीज मीटर रिडरने ग्राहकांचे घेतलेले मीटर रिडींग व त्याच ग्राहकांचे महावितरण कर्मचा:यांनी घेतलेले रिडींग यात तफावत आढळून आल्याने धुळे, नंदुरबार, शहादा तसेच मुक्ताईनगर अशा सात खाजगी एजन्सीच्या दोषी मीटर रिडरविरोधात महावितरण कंपनीतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आह़े मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी संबंधित मीटर रिडींग एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आह़े