जळगाव - जिल्हा न्यायालयात खोटा व बनावट ऐपतीचा दाखला दाखवून न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या संदीप ओंकार पवार (३०, गारखेडा, ता. जामनेर) या तरूणाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलीस ठाण्यात २९५/२०१९ प्रमाणे दीपक भगवान माळी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल आहे. तसेच भादंवि कलम ३९२ हाणामारीच्या प्रलंबित गुन्ह्यातील दुसरा संशयित संदीप ओंकार पवार याच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाय्यक मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुरू होता. संशयित संदीप पवार याने या प्रलंबित गुन्ह्यासाठी जामनेर तहसीलदार यांच्याकडील ऐपतीचा खोटा व बनावट दाखला तयार करून जळगाव न्यायालयात सादर केला. तो न्यायालयाला खरा भासवून न्यायालयाची दिशाभूल केल्या प्रकार न्यायालयाला समजल्यानंतर संदीप पवार याच्या विरोधात विलासचंद गजानन अंबटकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा करीत आहे.