जामनेर : बनावट मालक व साक्षीदार हजर करून संगनमताने प्लॉटची परस्पर विक्री केल्याप्रकरणी बुधवारी येथील पोलिस ठाण्यात अजय प्रभाकर पाटील (नाईक) यांच्यासह तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.कल्याण येथील शोभा राजू करडे यांनी २० आॅगस्ट रोजी याबाबत दुय्यम नबंधक व पोलिस निरीक्षकांकडे तक्रार दिली होती. मात्र, तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलने तक्रार पाठविली होती.‘लोकमत’ने याबाबत पाठपुरावा केल्याने पोलिसांनी दखल घेत गुन्हा नोंदवीला.करडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय पाटील, पुष्पा नामदेव शेनाळे व श्रीकृष्ण नारायण ओक यांनी संगनमताने करडे यांचे नावे असलेला वाकी खुर्द शिवारातील प्लॉट १७ आॅक्टोबर २०१८ रोजी जामनेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट मालक व साक्षीदार उभे करुन अजय पाटील याने स्वत:च्या नावे करुन घेतला. हा प्लॉट २० मार्च २०१९ रोजी भूषण संभाजी सोनार यांना विक्री केला. या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक विकास पाटील तपास करीत आहेत.