जळगाव : आगामी सण, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गुन्हेगारीत अग्रेसर असलेल्या १३ जणांच्या टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. १४ जणांच्या यादीतून एक गुन्हेगार शहरात नसल्याने त्याला वगळण्यात आले आहे. हे सर्व गुन्हेगार शनी पेठ व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला आहेत.
टोळीप्रमुख नीलेश उर्फ लोमेश युवराच सपकाळे (रा.जैनाबाद), सदस्य रुपेश मनोहर सोनार (रा.मोहन टॉकीज जवळ), मुन्ना उर्फ रतिलाल संतोष सोनवणे (रा.जैनाबाद), युवराज नामदेव सपकाळे (रा.जैनाबाद), श्यामकांत आनंदा कोळी (रा.हरीओम नगर), आकाश युवराज सपकाळे (रा.जैनाबाद), शुभम रघुनाथ तायडे (रा.जैनाबाद), गणेश दिलीप सोनवणे (रा.जैनाबाद), अनिल लक्ष्मण घुले (रा.रामेश्वर कॉलनी), संदीप उर्फ राधे संतोष शिरसाठ (रा.सुप्रीम कॉलनी), अमोल छगन कोळी (रा.एमआयडीसी), विक्की नरेंद्र पाटील (रा.एमआयडीसी) व विशाल लक्ष्मण सोनार (रा.अयोध्या नगर) यांना हद्दपार करण्यात आले आहे तर शाहरुख उर्फ डॉलर खलील अली मो.शकील (रा.गेंदालाल मील) याला या प्रस्तावातून वगळण्यात आले आहे. महाराष्टÑ पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांना आहेत. त्यानुसार डॉ.पंजाबराव उगले यांनी ही गुन्हेगारी टोळी हद्दपार केली आहे.
टोळीवर तीन पोलीस ठाण्यात एकत्रित ९ गुन्हेया गुन्हेगारी टोळीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५, शहर ३ व शनी पेठ पोलीस ठाण्यात १ असे ९ गुन्हे एकत्रित दाखल आहेत. त्यात जबरी चोरी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व हाणामारी या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यातील काही गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत.दरम्यान, शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेली ७ जणांनी आणखी एक टोळी हद्दपारीच्या प्रक्रियेत आहेत. येत्या दोन दिवसात त्याबाबत आदेश निघण्याची शक्यता आहे.