शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

४० हजार हेक्टरात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:13 AM

हवामान खात्याचा अंदाज पूर्णपणे चुकल्याने अमळनेर तालुक्यातील एकूण ५४,०९८ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ४१ हजार हेक्टर जिरायत क्षेत्रावर यंदा दुबार ...

हवामान खात्याचा अंदाज पूर्णपणे चुकल्याने अमळनेर तालुक्यातील एकूण ५४,०९८ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ४१ हजार हेक्टर जिरायत क्षेत्रावर यंदा दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवले आहे. मृग नक्षत्राची पेरणी सर्वोत्तम गणली जाते व यंदा १०० टक्के पावसाच्या भविष्यवाणीवर विसंबून तालुक्यात जिरायत शेतीत २८,४७६ हे. कापूस लागवड, ६,७९४ हे. मका, १,५४४ हे. ज्वारी, १,१२४ हे. बाजरी, मूग १,३३१ हे., उडीद ४९४ हे., भुईमूग २०३ हे., सोयाबीन. ८४ हे. व इतर पिके मिळून ४१,३९१ हेक्टर क्षेत्रात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी पेरणी करून नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला; पण जवळपास दीड महिन्यापासून पेरलेल्या क्षेत्रावर पाऊस पडलाच नाही. कोंब कोमेजून जमिनीतच गाडले गेले. बी-बियाणे, खते, मजुरीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला.

पीक पेऱ्यात बदल

नगदी पीक म्हणून गणले जाणारे कापूस पीक हे आठमाही पीक असून, दीड महिना उशिरामुळे आता कापूस उत्पादनाची आशा मावळली. अमळनेर तालुक्यात १२ जुलैपासून कमी- जास्त प्रमाणात तुरळक स्वरूपात का असेना; पण पावसाने हजेरी लावली. पहिली पेरणी वाया गेली. दुबार पेरणीत आता शेतकऱ्यांनी अल्प मुदतीची पिके मका, बाजरी, सूर्यफूल अशा पिकांना पसंती दिली आहे. सुमारे ९० दिवसांच्या कालावधीची ही पिके निघाल्यावर, त्यावर हरभरा, करडई, गहू यासारखी पिके घेता येतील.

बागायती क्षेत्रावरही परिणाम

तालुक्यात सुमारे १२,१२७ हेक्टर क्षेत्रात बागायती कापूस, १५२ हेक्टरात पपई, २६७ हे. क्षेत्रात फळफळावळ, भाजीपाला, तर १६१ हेक्टर केवळ गुरांसाठी खोंडे, चारा म्हणून मे महिन्यात ठिबक सिंचनावर लागवड आहे. लागवडीनंतर एक महिनापर्यंत विहिरीची क्षमता टिकून राहिली. जून महिना कडक तापमानात गेल्याने विहिरींची पातळी खालावून पिकांची वाढ खुंटू लागली आहे.

अजून पाहिजे तसा पाऊसच झालेला नाही. नद्या, नाले कोरडेच आहेत. पाऊस आता येईल, या आशेने शेतकऱ्यांनी दुबार लागवड व पेरणीस सुरुवात तर केली; पण भविष्य अंधारातच आहे.