जळगाव : जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यातील १५०२ गावांची हंगामी पैसेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली असून यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत असून या सर्व गावांमध्ये टंचाईचे निकष लागू होण्याचे संकेत आहेत. नजर पैसेवारीमध्ये सर्व गावे ५० पैशांच्या वर होती, हे विशेष. दरम्यान, मंगळवारीच शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये धरणगाव व एरंडोल तालुक्याचा समावेश नसला तरी त्यांनाही टंचाईचे निकष लागू होणार आहे.यंदा झालेल्या पावसापैकी पूर यावा असा पाऊस मोजक्याच वेळी झाला. जमिनीत जिरणारा पाऊस जास्त प्रमाणात झाला. त्यामुळे पावसाची टक्केवारी कमी असली तरीही पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची स्थिती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे होते, त्यामुळे नजर पैसेवारी जाहीर करताना सर्व गावे ५० पैशांच्या वर होती. मात्र त्यानंतर पाण्याअभावी पिकांची स्थिती बिकट होत गेली व हंगामी पैसेवारीमध्ये एकही गावाची पैसेवारी ५० पैशांच्या वर नसल्याची स्थिती समोर आली.जिल्ह्यातील केवळ १३ तालुक्यात दुष्काळदुष्काळाबाबत सत्यमापनातील निष्कर्षाच्या आधारे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील धरणगाव व एरंडोल तालुका वगळता उर्वरित १३ तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. दुसरीकडे हंगामी पैसेवारी जाहीर करताना सर्व १५ तालुक्यांची पैसेवारी ५० पैशांच्या आत जाहीर झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये धरणगाव व एरंडोल तालुक्यांचाही समावेश होतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.टंचाईचे निकष लागूधरणगाव व एरंडोल तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला नसला तरी व तेथील पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याने तेथे टंचाईचे निकष लागू होऊ शकतात, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.५० पैशांच्या आत हंगामी पैसेवारी असलेल्या गावांची तालुकानिहाय संख्याजळगाव - ९२, जामनेर - १५२, एरंडोल - ६५, धरणगाव - ८९, भुसावळ - ५४, यावल - ८४, रावेर - १२१, मुक्ताईनगर - ८१, बोदवड - ५१, पाचोरा - १२९, चाळीसगाव - १३६, भडगाव - ६३, अमळनेर - १५४, पारोळा - ११४, चोपडा - ११७.
जळगाव जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये लागू होणार टंचाईचे निकष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:58 PM
हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत
ठळक मुद्देधरणगाव व एरंडोल तालुक्यांनाही टंचाई निकषांचा फायदाजिल्ह्यातील केवळ १३ तालुक्यात दुष्काळ