जळगाव : पोषण आहारात ठेकेदाराकडून करारनाम्याच्या भंग झाल्यासंदर्भातील तक्रारीच्या संदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे चार महिन्यांपासून आदेश देऊनही ते सादर होत नसल्याने अखेर शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला़ अखेर शिक्षण विभागाने तडकाफडकी हे कागदपत्रे सादर केली आहेत़सन २०१४ मध्ये पोषण आहाराच्या करारनाम्यात मिरची पावडरचा उल्लेख नसतानाही ठेकेदाराने स्वत:चा माल खपविण्यासाठी ७ ते ८ आठ लाखांच्या मिरची पावडर शाळांमध्ये वितरीत केल्या होत्या़ यासह अनेक ठिकाणी धान्यादी मालाच्या वितरणात अनियमितता होती़ यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी तक्रार दिली होती़विभागीय आयुक्तस्तरावरून यासंदर्भात तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डी़ पी़ महाजन यांच्याकडे २०१८ मध्ये चौकशी सोपविली होती़पुरावेही झाले सादररवींद्र शिंदे यांनी तक्रारीबाबत संचालनालयाकडे पूर्ण पुरावे सादर केले होते़ दरम्यान, या पुरव्यांची शहानिशा करणारे कागदपत्र सादर करण्याच्या सूचना शिक्षण संचालकांनी प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ़ देवांग व माध्यमिक शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील यांना वारंवार भ्रमणध्वनीद्वारे शिवाय तीन स्मरण पत्रे पाठवून दिल्या होत्या़ मात्र, या सूचना पाळल्या न गेल्याने शिक्षण संचालकांनी संताप व्यक्त करीत शिक्षणाधिकाºयांना वरिष्ठांच्या सूचनांचे गांभिर्य नसल्याचे व संचालनालयाचा अवमान केल्याचे दिसून येत असल्याचे म्हणत कागदपत्रे सादर न केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला़एक फाईल अजूनही बाकीया इशाºयानंतर शिक्षण विभागाने तत्काळ ही कागदपत्रे सादर मात्र, त्यातील एक फाईल नंतर पोहचविण्यात आली व एक फाईल अजूनही बाकी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली़ या प्रकरणात काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे़
आदेशाचे गांभीर्य नसल्याचा शिक्षणाधिकाऱ्यांवर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 8:23 PM