गुढे ता. भडगाव जि. जळगाव : सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी गुढे येथे घडली.चुडामण सहादू पाटील (वय ५५) हे पिकांवर किटकनाशक फवारणीसाठी शेतात गेले असता त्याना सर्पदंश झाला. त्यानी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना आरोळ्या दिल्याने ते त्याच्याजवळ पोहचले. त्यांना तातडीने गुढे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तथापि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. भडगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. आणि रात्री आठ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोलमजुरी करुन आपल्या संसाराचा गाडा चालवणारा घरातील कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे .शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते विठोबा व भैया पाटील यांचे वडील होत.
गुढे येथे सर्पदंशाने शेतमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:16 PM
भडगाव तालुक्यातील गुढे येथे शुक्रवारी पिकांवर किटकनाशक फवारणीसाठी गेलेल्या शेतमजुराचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
ठळक मुद्देघरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगरगावकºयांमध्ये तीव्र हळहळ