राम जाधव / ऑनलाईन लोकमत
जळगाव : ब:याच दिवसांच्या खंडानंतर आलेल्या पावसाने गेल्या आठवडय़ात मुंबई, नासिक व पुण्यासह कोकण पट्टयातच पाय रोवल्याने उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता़ यामुळे खरीपाच्या पिकांना काही भागात काही अंशी जिवनदान मिळाले असले, तरी जोरदार पावसाची अत्यंत गरज अद्यापही आह़े मात्र दोन ते तीन आठवडे असलेल्या ढगाळ वातावरणामुळे व रिमङिाम पावसामुळे खरीपाच्या पिकांवर रसशोषक किडींना पोषक हवामान तयार झाल्याने त्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आह़े विशेष करून कपाशीच्या पिकावर तुडतुडे, थ्रिप्स व मिलीबग या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्याने कपाशीच्या पिकाचे नुकसान होत आह़े त्यामुळे निसर्गाने मारल्यानंतर आता उरला सुरला हंगाम ह्या किडींमुळे वाया जात आह़े बदलेल्या वातावरणामुळेही कपाशीच्या पिकांची पातीगळ मोठय़ा प्रमाणावर होत़े यामुळे कपाशी पिकाचे आणखीनच नुकसान होवून शेवटच्या काळात शेतक:यांना फटका बसत आह़े या किडीच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणा:या विविध प्रकारच्या औषधींनाही ही किडी प्रतिसाद देत नसल्यामुळे शेतक:यांचा खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आह़े या किडींची प्रतिकारक्षमता काळानुरूप वाढत आह़े तसेच सध्या ज्या गटातील औषधे या किडींवर फवारली जातात, त्या रासायनिक संयुगातील औषधांना ही किडी आता प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येत आह़े यामध्ये अॅसेटॅमिप्रिड, अॅसिफेट, इमिडाक्लोरोप्रिड, फिफ्रोनिल, फ्लुकोनॅमाईड इत्यादींचा समावेश आह़े कालांतराने या सर्वच रसशोषक किडींची प्रतिकारक क्षमता वाढल्याने अनेक दिवसांपासून बाजारात असलेल्या या औषधींचे प्रतिलिटर वापरण्याचे प्रमाण वाढवूनही त्यांचा परिणाम होत नाही़ मात्र पर्याय नसल्याने शेतकरी प्रमाण वाढवून याच औषधींचा वापर करावा लागत आह़ेसध्या बाजारात असलेल्या लॅमडा साहॅलोथ्रिन, डायमेथोएट, थायोमिथॅक्झॉम, सायपर मेथ्रिनसह प्रोफेनोफॉस इत्यादी आंतरप्रवाही औषधे वापरल्यास या किडींचा प्रादुर्भाव ब:याच अंशी कमी करता येईल़ मात्र ही औषधे प्रतिलिटर योग्य प्रमाणात वापरली जावीत़ दोन पेक्षा जास्त औषधे एकत्र वापरू नयेत़ 5 ते 10 मिली र्पयत स्टिकरचा वापर केल्यास जास्त लाभ मिळतो़ रसशोषक किडींचे प्रमाण वाढल्याने झाडे अशक्त होतात़ त्यामुळे या काळात झाडांना खाद्य भरपूर प्रमाणात दिले जाव़े तसेच पातीगळ होवू नये, म्हणून अल्फा नॅफथिल अॅसेटिक अॅसिड (प्लॅनोफिक्स) या संजिवकाचा 5 मिली प्रतिलिटर वापर करावा़ तसेच रासायनिक औषधांचा गृप बदलावा यामध्ये पुढील प्रमाणे औषधे प्रतिमिली वापरावीत़लॅमडा साहॅलोथ्रिन 15 डायमेथोएट 15 थायोमिथॅक्झॉम 15 सायपर मेथ्रिनसह प्रोफेनोफॉस 20