जळगावात भंगारातून कोटय़वधीची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:11 PM
या टोळीच्या माध्यमातून एकटय़ा जळगाव शहरात महिन्याकाठी कोटय़वधीची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
ऑनलाईन लोकमत / सुनील पाटील जळगाव, दि. 23 - चोरलेल्या ट्रकची भंगारात विल्हेवाट लावण्यासाठी दलाल सक्रीय असून त्याच्या माध्यमातून ट्रक चालक, ट्रक विकत घेणारा व त्यानंतर तोडलेल्या ट्रकचे साहित्य विकत घेणारा व काही गडबड झालीच तर सरकारी यंत्रणा सांभाळणारी एक टोळीच सक्रीय असून त्यांनी राज्यभर जाळे उभारले आहे. या टोळीच्या माध्यमातून एकटय़ा जळगाव शहरात महिन्याकाठी कोटय़वधीची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.गुजरातमधून व्हीस्कोप स्टेबल फायबर’ हा कच्चा माल (गाठी) घेऊन नागपूरला जाणा:या ट्रकची जळगाव शहरात भंगारात विल्हेवाट लावल्याची माहिती उघड झाल्यानंतर निवृत्त पोलीस कर्मचा:याचा मुलगा मोसीन सैयद मुस्ताक (वय 25 रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), भंगार व्यवसायातील कुख्यात गुन्हेगार यासीन खान मासुम खान (मुलतानी), त्याचा नातेवाईक जाबीर खान साबीद खान व तस्लीमखान अयुब खान यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ट्रक चालक सुरेश यादव व फिरोजखान जाफर उल्लाखान (रा.गिट्टी खदान, नागपूर) हे दोन्ही जण फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक नागपूर येथे गेलेले आहे. दरम्यान, ट्रक व अन्य वाहनांची खरेदी-विक्री, भंगारात साहित्य विक्री करणे व दलाली यात महिन्याकाठी कोटय़वधीची उलाढाल होते. कोणाच्या लक्षात न येणा:या या व्यवसायाकडे पोलीस अधिका:यांचेही दुर्लक्ष झाले होते. आता मात्र या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे. अजिंठा चौकातील इदगाह कॉम्प्लेक्ससमोरुन बुलडाणा येथील ट्रक (क्र.एम.एच.28 ए.बी.7608) चोरी झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. हा ट्रक चोरी झाल्याच्या धक्क्याने मोहम्मद नजीर अब्दुल हकीम या चालकाचा मृत्यू झाला होता. बुलडाणा येथून सोयाबीन हा ट्रक जळगावात आला होता. या ट्रकचाही अजून शोध लागलेला नाही. दरम्यान, बाहेर जिल्ह्यातून चोरी झालेल्या ट्रकची शहरात कुठेच नोंद होत नसल्याने असे ट्रक तत्काळ तोडून त्याचे स्पेअर पार्ट वेगळे केले जात असल्याचे प्रकार घडत आहेत. चोरलेला ट्रक भंगारात तोडल्यानंतर त्याचे स्पेअर पार्ट खरेदी करणारी एक टोळी शहरातच सक्रीय आहे. प्राथमिक चौकशीत शब्बीर मणियार, सादीक मुलतानी व शागिर खान या तिघांची नावे समोर आलेली असली तरी त्यात आणखी दहा ते बारा जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या तिघांना अटक झाली तर आणखी नावे पुढे येतील, असेही सांगण्यात येते. ट्रक चोरी करणे व त्याची भंगारात विल्हेवाट लावणा:या गुन्हेगारांच्या संपर्कात एक पोलीस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटकेतील आरोपींची दुचाकी याच पोलिसांकडे सतत असायची. रात्रीच्या गस्तीवर असताना तो गुन्हेगारांच्या दुचाकीचा वापर करीत असल्याची माहिती मिळाली आहे. या कर्मचा:याची वरिष्ठ अधिका:यांनी चौकशीही केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी त्याने प्रय} केले होते. ऑटो नगरातील भंगार बाजारात दिवसाढवळ्या चोरीच्या ट्रक व अन्य गाडय़ा हातोहात तोडल्या जातात, याची पोलिसांमधील काही कर्मचा:यांना माहिती देखील आहे. भंगार बाजारात चौकशीसाठी गेलेल्या दोन पोलिसांना यासीन मुलतानी याने मध्यंतरी मारहाण केली होती. तसेच महावितरणच्या कर्मचा:यांनाही मुलतानी याने मारहाण केलेली आहे. त्यादिवसापासून यासीन हा पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या रडारवर होता. कॉन्स्टेबल अशरफ शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी कारवाईसाठी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, सचिन मुंडे, अशरफ शेख व गोविंदा पाटील यांचे पथक नेमले व त्यांनी हा सापळा यशस्वी केला. हा सापळा उधळून लावण्यासाठी पोलीस दलातील काही कर्मचा:यांनीही प्रय} केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, यासीनविरुध्द जळगाव, भुसावळ, नवी मुंबई येथे अनेक गुन्हे दाखल आहेत.