चोपडा : शहर आणि तालुक्यात एकत्रित ९० संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली.त्यात २५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर ६५ रुग्ण निगेटिव्ह आले.१ रोजी प्राप्त अहवालानुसार पॉझिटिव्ह मध्ये रत्नदीपनगर मध्ये एक रुग्ण, मिल्लत नगर मध्ये तीन, भाई कोतवाल रोड परिसरात तीन, देसाई गल्ली मध्ये एक, शेतपुरा भागात दोन, बोरोले नगर मध्ये एक, बोरोले नगर क्रमांक ३ मध्ये एक, तारामती नगर मध्ये एक, गणेश नगर मध्ये एक, मराठे गल्ली भागात एक, इटवाय ता. पारोळा येथे दोन तर चोपडा ग्रामीण भागात गरताडयेथे चार रुग्ण, हातेड खुर्द येथे एक, निमगव्हाण येथे तीन असे दिनांक १ आॅगस्ट रोजी २५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. चोपडा शहर आणि तालुक्यात आता एकूण आठवे शतक पार झाले असून रुग्णांची संख्या ८२० एवढी झालेली आहे. त्यापैकी ६२२ रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत तर १६७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी दिली. दरम्यान कोरोनाचा कहर थांबविण्यासाठी कठोर उपाय योजावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
चोपड्यात बाधितांच्या संख्येचे आठवे शतक पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 11:16 PM