रवींद्र पाटील हे येथील स्टेट बँकेच्या कृषी शाखेत चालक पदावरैन सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. कोरोना काळात व्यायाम म्हणून त्यांनी सायकलला पायडल मारले. दरवर्षी ते ३५ ते ४० किमी सायकलफेरी करतात.
चौकट
जिंतूर ते येडशी ६०० किमी अंतर पार
रवींद्र पाटील यांनी २००, ३०० व ४०० किमी सायकल स्पर्धा यशस्वी केली आहे. एकाच कॅलेंडर वर्षात सलग अशा स्पर्धा पार करून ६०० किमीची स्पर्धा पूर्ण केल्यानंतर सुपर राईडर अर्थात 'एसआर'चा सन्मान मिळतो.
पाटील यांनी जिंतूर ते येडशी या ६०० किमी स्पर्धेसाठी २४ रोजी पहाटे चार वाजता सायकलला पायडल मारले. डोक्यावर पावसाळी आभाळ घेऊन त्यांची सायकल सलग ३८ तास धावत होती. ६०० किमी अंतर ४० तासात पार करायचे असताना रवींद्र पाटील यांनी ते ३८ तासातच क्राॕॅस करीत एसआर सन्मानाला गवसणी घातली. सायंकाळी साडेसहा वाजता ते पुन्हा जिंतूरला पोहचले.
१...रवींद्र पाटील यांनी जुलै महिन्यात इतर पाच सायकलस्वारांसोबतच चाळीसगाव ते पंढरपूर, अक्कलकोट - तुळजापूर अशी एक हजार २० किमी सायकलवारीही पूर्ण केली आहे.
शरीर तंदुरुस्त ठेवायचे असले तर दरदिवशी सायकलिंग केली पाहिजे. सातत्य आणि सराव असल्यास वयाचे बंधन गळून पडते. मी वयाच्या ६० व्या वर्षी ६०० किमी सायकल प्रवासाची स्पर्धा यशस्वी केली. कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी रोज एक तास सायकल चालवावी. बरेच आजार दूर पळतील.
-रवींद्र पाटील
एसआर सायकलस्वार, चाळीसगाव.