चुंचाळे, ता.यावल, दि.7- श्री रघुनाथ बाबा व त्यांचे शिष्य श्री वासुदेवबाबा यांचा एकाच तिर्थावर वैशाख शुद्ध बारसला रविवार, 7 मे रोजी साजरी होणा:या पुण्यतिथी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरातमधील भाविकांनी मोठी गर्दी केली आह़े रविवारी सकाळी 11़30 वाजेच्या सुमारास नगराज महाराज व सुरतचे दत्ता महाराज यांच्या हस्ते होम हवन व महाआरती करण्यात आली़ प्रसंगी समाधीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती़
दरम्यान, चुंचाळे गाव सुकनाथबाबांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. श्री सुकनाथ बाबा यांनी चुंचाळे गावात 12 वर्षे तपश्चर्या केली. श्री रघुनाथ बाबा यांचा जन्म चुंचाळे येथे झाला मात्र त्यांनी वड्री, ता.चोपडा येथे त्यांचे पिता श्री सुकनाथबाबांच्या मंदिराची निर्मिती केली. श्री रघुनाथबाबा हे सन 1979 मध्ये वैशाख शुद्ध बारसला समाधीस्त झाले.