पोलिसांची नियुक्ती
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. यात मुख्य गेटवर दोन सी टू कक्षाबाहेर तसेच अधिष्ठाता यांच्या निवासस्थानाबाहेर काही अशा प्रकारे त्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
नातेवाईकांची गर्दी
जळगाव : कोरोना रुग्णालयात दाखल रुग्णांच्यानातेवाईकांची गर्दी कायम राहत असल्याचे चित्र आहे. सेवालयाच्या बाजुला असलेल्या शेडमध्ये हे नातेवाईक थांबून असतात. अनेक वेळा कक्षांमध्ये जाण्यासाठी अनेक जण सुरक्षा रक्षकांशीही वाद घालत असल्याचे चित्र असते. सुरक्षा रक्षक गेट बंद करून आवश्यक त्यांनाच आत सोडतात.
दहा हजारापर्यंत लसीकरण
जळगाव : जिल्ह्यात प्रथमच एका दिवसात ९ हजार ९ ४९ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. ही संख्या ११५०६६ वर पोहोचली आहे. तर १५ हजार १४५ लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ८२५४ लोकांनी लस घेतल्याची नोंद शासकीय अहवालात करण्यात आली आहे.
डॉक्टरांची वाट
जळगाव : जीएमसीत प्रतिनियुक्तीवरील २० डॉक्टरांपैकी १० डॉक्टर रूजू झाले आहेत. १० डॉक्टर आठवडा उलटूनही रुजू झालेले नाहीत. त्यामुळे हे डॉक्टर कधी रूजू होणार याची प्रशासकीय यंत्रणेला प्रतिक्षा असल्याचे चित्र आहे. दरमयान, या डॉक्टरांबाबत वरिष्ठ पातळीवरून विचारणा झालेली अाहे.
९०० रुग्ण ऑक्सिजनवर
जळगाव : जिल्ह्यातील ऑक्सिजनरील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या ९१२ वर पोहोचली आहे. ही संख्या वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात ाहे. ऑक्सिजन बेडचा मुद्दा यामुळे समोर आला आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्याही २५०० वर पोहोचली आहे. सक्रीय रुग्ण साउे दहा हजारांवर पोहोचले आहे.