भुसावळ, जि. जळगाव, दि. 17 - भुसावळातील मुख्य टपाल कार्यालयात सीएसआय (कोअर सिस्टम इंटीग्रेटर) प्रणालीचे औरगांबाद परिक्षेत्राचे पोस्ट मास्तर जनरल प्रणव कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल़ेडाक अधीक्षक डी़एस़ पाटील, सहाय्य अधीक्षक एम़ एस़ जगदाळे, निरीक्षक एम़बी़ रुले, तक्रार निरीक्षक निशांत शर्मा, पोस्ट मास्तर बी़आऱवानखेडे, ग्राहक, एजंट व कर्मचारी उपस्थित होत़े35 कार्यालयात कोअर बॅकींगभुसावळ विभागातील 35 टपाल कार्यालयात कोअर बॅंकींग प्रणाली सुरू करण्यात आली आह़े भुसावळ डाक विभाग हा सीएसआय प्रणाली लागू करणारा म्हैसूर व पुणे डाक विभागानंतर भारतातील तिसरा तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिल्या क्रमांकाचा डाक विभाग ठरला आह़ेकाय आहेत प्रणालीचे फायदेसीएसआय प्रणालीमुळे एखादे रजिस्टर, स्पीड पोस्ट वा ई मनी ऑर्डर बुक केल्यानंतर या व्यवहाराचा एसएमएस प्रेषक व प्राप्तकर्ता (पाठवणारा व मिळवणारा) या दोघांनाही प्राप्त होईल़ एखादे आर्टीकल बुक केल्यानंतर त्या आर्टीकलची पुढील हालचाल, गतीदेखील मिळणा:या पावतीवर नोंदून मिळेल़ या प्रणालीमुळे कर्मचारीवर्गाचे रेकॉर्डदेखील सुटसुटीत होईल तसेच टपाल खात्यातील कामकाज पेपरलेस होण्यास मदत होणार आह़े
भुसावळच्या टपाल कार्यालयात सीएसआय प्रणाली
By admin | Published: April 17, 2017 1:11 PM