शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

काकस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 1:54 AM

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘प्रसंगा असता लिहिले’ या सदरात अॅड. सुशील अत्रे यांचा विशेष लेख.

पितृपक्ष सुरू झाला आहे हे कसे ओळखावे? अलिकडे हे अगदी सोपं झालंय. फेसबुकवर आणि व्हॉटस्अॅपवर कावळ्यांचे फोटो आणि त्यासोबत टिंगलवजा शुभेच्छा दिसायला लागल्या की समजावं, पितृपक्ष सुरू झाला. कोणत्याही धार्मिक रुढीची (विशेषत: हिंदू) टिंगल करणं ही आपल्या देशात सगळ्यात सोपी गोष्ट आहे. गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकण्याइतकीच सोपी! त्याला अक्कलही लागत नाही किंवा जबाबदारीची जाणीवही लागत नाही. त्यामुळे पितृपक्ष किंवा श्राद्ध म्हणजे नक्की काय? ते कशासाठी? त्यामागची भावना काय असते, आणि हा ‘बावळटपणा’ फक्त हिंदू धर्मातच आहे का? असल्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधत नसतो. जे चाललंय ते चाललंय - बस ! पितृपक्ष अथवा ‘महालयकाल’ किंवा ग्रामीण बोलीत ‘पित्तरपाटा’ म्हणजे भाद्रपद वद्य पक्ष. या काळात आपल्या कुटुंबातील किंवा कुळातील दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहतात. ‘श्राद्ध’ या शब्दाचा अर्थच मुळी, ‘श्रद्धेने केलेले कर्म’ असा आहे. ‘श्रद्धया क्रियते इति श्राद्धम्’ ! ती एक प्रकारची कृतज्ञतेची भावना आहे. ‘जो शहीद हुवे है उनकी, जरा याद करो कुर्बानी.. या ओळींमागे जी भावना आहे तीच भावना श्राद्ध विधींच्या मागे आहे. जे देशासाठी शहीद होतात त्यांची आठवण सगळ्या देशाने ठेवली पाहिजे. पण ज्यांनी आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी कष्ट उपसले, आयुष्य वेचलं, त्यांची आठवण आपल्या कुटुंबाने ठेवणं अपेक्षित नाही का? तेच श्राद्धात केलं जातं. त्यासाठीच पितृपक्ष हा स्वतंत्र कालावधी राखून ठेवलाय. त्यामुळे पितृपक्षाची टिंगल करण्यापूर्वी ही भावना लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि हे माहिती असूनही एखाद्याला काहीही करण्याची इच्छा नसेल, तर नका करू. शेवटी कृतज्ञता ही एक जबाबदारीची भावना आहे. ती अजिबात नसलेले कित्येक महाभाग समाजात असतातच. त्यात आश्चर्य कसलं? पण गौरी लंकेशच्या मृत्यूनंतर हातात मेणबत्त्या घेऊन शपथा घेणारे दीडशहाणे इतरांनी केलेल्या श्राद्धाला फिदीफिदी हसतात, याचं नवलं वाटतं! काय फरक आहे दोघांमध्ये? दोघेही आपापल्या भावना व्यक्त करताहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने करताहेत इतकंच. शेवटी मेणबत्ती हे ही कशाचं तरी प्रतीक आहे आणि भाताचा पिंड हेही कशाचं तरी प्रतीकच आहे. खरं तर श्राद्धामागची किंवा पितृपक्षा मागची मूळ भावना किती उदात्त आहे आणि आंधळी, एकांगी टीका करणा:यांनी जरा माहिती घेतली तर लक्षात येईल की ही भावना अगदी सार्वत्रिक, सर्वधर्मीय अशी आहे. जवळपास प्रत्येक धर्माच्या किंवा उपासना पद्धतीच्या परंपरेत या भावनेला स्थान आहेच. मूळात आपल्याकडे श्राद्ध ही कल्पना लवचिक आहे. ते अमूकच प्रकारे केलं पाहिजे, याला मूळात बंधन नव्हतं. ती बंधनं, ते कर्मकांड आलं ते परंपरेने. ऋग्वेदात ‘पितरां’चा उल्लेख आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे. पण श्राद्धविधीचा कोणताही उल्लेख नाही. ते विधी आले स्मृती आणि पुराणांमधून. त्यातही पिढय़ा, दर पिढय़ा भर पडत गेली. विधी वाढत गेले. त्यांची चिकित्सा फारच थोडय़ा जणांनी केली. परिणामी मूळ कृतज्ञतेची भावना बाजूला पडली आणि अवडंबरामुळे टीकाच वाटय़ाला आली. पारशी लोकांच्या कॅलेंडरमध्ये ‘शेनशाई’ कॅलेंडरमध्ये वर्षाचा शेवटचा महिना असतो ‘अस्पंदाद’चा महिना. या महिन्याच्या शेवटचे पाच दिवस आणि वर्षाअखेरी असलेले जादा पाच दिवस. ज्यांना ‘गाथा’ म्हणतात. असे 10 दिवस मयत पूर्वजांचे स्मरण करुन त्यांना फळे, फुले वाहतात. मुसलमानांच्या हिजरी कॅलेंडरमधला आठवा महिना आहे ‘शाबान’ चा महिना. या महिन्यातील पंधरावी रात्र ही हिशोबांची रात्र (लयलात् अल् बारात) मानली जाते. त्यासाठी चौदाव्या दिवशी मृत पूर्वजांचे स्मरण करून दानधर्म करतात. ािश्चनांमध्ये प्रोटेस्टंट तर नाही, पण कॅथोलिक ख्रिश्चनसुद्धा ठराविक तारखेला चर्चामध्ये जाऊन मयत पूर्वजांसाठी प्रार्थना करतात. एक लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे सगळीकडेच हे पूर्वज स्मरण बहुदा वर्षाच्या शेवटी केलं जातं. म्हणजे बघा- प्राचीन काळी हिंदू वर्ष अश्विन महिन्यापासून सुरू होत असे. पारशांचे नववर्ष ‘फरवर्दिन’ महिन्यापासून सुरू होतं. मुसलमानांचा पहिला महत्त्वाचा महिना ‘रमझान’ आहे. या तिन्ही महिन्यांच्या आधीचा महिना हा पूर्वजांच्या पूजेसाठी आहे केवढं साम्य. असं मानतात, की कावळा एकाक्ष असल्याने तो कोणतीही गोष्ट आधी तिरकी मान करून दोन्ही बाजूने नीट निरखून घेतो. कोणत्याही धार्मिक परंपरेला, रुढीला अलिकडच्या बुद्धिवंत कावळ्यांनी असं आधी निरखून बघितलं, तर जास्त बरं होईल. निदान येता-जाता चोचीने टोचा मारणं तरी कमी होईल.