जळगाव : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे यांचे पुत्र, माजी आमदार राजीव देशमुख यांचे बंधू आदींसह अनेक दिग्गज नेत्यांचे नातेवाईक नशीब आजमावत आहेत. त्यांच्या भाग्याचा फैसला २३ रोजी मतमोजणीनंतर होईल. दिग्गजांचे नातेवाईक जि.प.च्या आखाड्यात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाच्या जि.प. निवडणुकीत दिग्गजांचे नातेवाईक रिंगणात असल्याने तेवढीच चुरस निर्माण झाली. जिल्हाभरात याबाबत चर्चा सुरू होती. राजकीय वर्तुळातील जाणकार मागील आठवडाभर वेगवेगळे अंदाज व्यक्त करीत होते. यामुळे दिग्गज नेते आपल्या नातेवाईकांना निवडून आणण्यात यशस्वी होतील की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता २३ रोजी मतमोजणीनंतर शमणार आहे. १) देवगाव-तामसवाडी : आमदार डॉ.सतीश पाटील यांचे पुत्र रोहन पाटील व माजी आमदार चिमणराव पाटील यांचा पुतण्या समीर वसंत पाटील.२) लोहटार-खडकदेवळा : माजी आमदार दिलीप वाघ यांची भावजई ज्योती संजय वाघ व जि.प.चे माजी उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी यांची स्नुषा वृंदावली सोमवंशी.३) पाळधी -बांभोरी : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील व जि.प. सदस्या छाया पाटील यांचे पती रमेश पाटील४) निंभोरा-तांदलवाडी : जिल्हा बँकेचे संचालक नंदकिशोर महाजन व प्रगतिशील शेतकरी भास्कर विठ्ठल पाटील. ५) कानळदा-भोकर : जि.प.चे माजी अध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे यांचे बंधू प्रभाकर सोनवणे व बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील (लकी टेलर). ६) म्हसावद-बोरनार : जि.प.चे माजी अध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे यांची पत्नी तथा जि.प.च्या माजी सभापती लीलाबाई सोनवणे व भिलाभाऊ सोनवणे यांचे पुत्र पवन सोनवणे. ७ ) सोनवद-पिंप्री खुर्द : जि.प.चे माजी सभापती पी.सी.पाटील यांची पत्नी वैशाली पाटील व जिनिंग व्यावसायिक गोपाळ चौधरी. ८) कुºहे-वराडसिम : आमदार संजय सावकारे यांची वहिनी पल्लवी सावकारे व संगीता सपकाळे. ९) किनगाव-डांभुर्णी : जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर.जी.पाटील यांची पत्नी अरूणा पाटील व अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी आयुक्त विजय पाटील यांची पत्नी शैलजा पाटील. १०) मंगरूळ-शिरसमणी : माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे यांचे पुत्र पराग मोरे व डॉ.हर्षल माने. ११) कासोदा-आडगाव : जि.प.चे माजी उपाध्यक्ष मच्ंिछंद्र पाटील यांची पत्नी उज्ज्वला पाटील व माजी उपाध्यक्ष हिंमतराव पाटील यांची पत्नी सुनंदा पाटील. १२) फत्तेपूर-तोंडापूर : जि.प.तील निवृत्त अभियंता जे.के.चव्हाण यांची पत्नी रजनी चव्हाण व जिल्हा बँकेचे माजी संचालक डी.के.पाटील यांची पत्नी विजया पाटील.१३) देवळी-तळेगाव : माजी आमदार राजीव देशमुख यांचे धाकटे बंधू अतुल देशमुख व भाजपाचे किशोर भिकनराव पाटील. १४) कळमसरे-जळोद : भाजपातून राष्टÑवादीत प्रवेश केलेले अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील व काँग्रेसच्या सिंधूबाई प्रताप पाटील. १५) साळवा-बांभोरी खुर्द : माजी जि.प.अध्यक्ष जानकीराम पाटील यांची पत्नी संगीता पाटील व भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे.
महत्त्वाच्या लढतींबाबत उत्सुकता
By admin | Published: February 23, 2017 1:20 AM