मोहन सारस्वतजामनेर, जि.जळगाव : विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राजकीय अस्थिरता संपली. भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने त्याचे भविष्यात तालुक्याच्या राजकारणावर काय व कसे परिणाम होतील याची चर्चा सत्ताधारी व विरोधक भाजप कार्यकर्ते करीत आहे. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्रिपद भूषविलेल्या गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात प्रबळ असलेल्या भाजपला रोखण्याचे काम महाविकास आघाडी कसे करते हे नजीकच्या काळात दिसून येईलच.तालुक्यातील ग्राम पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत असून सहकारी संस्थेतदेखील भाजपने ईश्वरलाल जैन गटाशी हात मिळवणी करून सत्ता हस्तगत केली आहे. २५ वर्षांपासून महाजन आमदार असून त्यातील १५ वर्षे त्यांनी विरोधात काढली. १० वर्षे मिळालेल्या सत्तेपैकी पाच वर्षे त्यांना मंत्रिपद मिळाले. गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी खेचून आणला. जामनेर पालिकेच्या माध्यमातून सुमारे ३०० कोटींची कामे केली काही सुरू आहेत.२०१४ नंतर राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार असले तरी तालुक्यात शिवसेना पाहिजे तशी पाय रोऊ शकली नाही. शिवसेनेला वाढू न देण्यामागे मित्र पक्षच असल्याची भावना शिवसैनिकांच्या मनात आहे.पंचायत समितीत शिवसेनेचा एकही सदस्य नसला तरी राष्ट्रवादीचे मात्र तीन सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सरोजिनी गरुड व प्रमिला पाटील या दोन राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. पुढील वर्षी बाजार समिती व शेतकरी संघाची निवडणूक होऊ घातल्याने यात महाविकास आघाडी उतरण्याची दात शक्यता आहे. याचबरोबर काही ग्राम पंचायत निवडणूक होणार असल्याने त्यातही भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते.पाच वर्षे सत्तेत राहिलेल्या भाजपला पुन्हा विरोधकाची भूमिका वठवावी लागणार आहे. सत्तांतरानंतर विविध शासकीय समित्यांची पुनर्रचना झाल्यास आघाडीतील कुणास यात संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. असे असले तरी गिरीश महाजन हेच आमदार असल्याने फारसा काही फरक पडेल, असे वाटत नाही, अशी शक्यता वाटते.
जामनेरच्या राजकारणावर महाविकास आघाडीच्या परिणामाची उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 2:49 PM
विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल एक महिन्यानंतर राजकीय अस्थिरता संपली. भाजपला बाजूला सारून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याने त्याचे भविष्यात तालुक्याच्या राजकारणावर काय व कसे परिणाम होतील याची चर्चा सत्ताधारी व विरोधक भाजप कार्यकर्ते करीत आहे.
ठळक मुद्दे‘महाविकास आघाडी’नंतर...ग्राम पंचायत निवडणुकीमुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहू शकतेपंचायत समितीत शिवसेनेचा एकही सदस्य नसला तरी राष्ट्रवादीचे तीन सदस्यजिल्हा परिषदेत सरोजिनी गरुड व प्रमिला पाटील या राष्ट्रवादीच्या दोन सदस्या