चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून गुरुवारी दुपारी राजपूत लोकमंगल कार्यालयात झालेल्या वीज ग्राहकांच्या मेळाव्यात तक्रारींचा पाऊस पडला. अ.भा. ग्राहक पंचायत आणि वीज वितरण कंपनीच्या संयुक्त विद्यमाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतक-यांना शेतीसाठी पाणी आणि वीज मिळावी. यासाठी आपण कटिबद्ध आहोत. सद्य:स्थितीत तालुक्यात पाण्याची उपलब्धता चांगली असली तरी शासनाने वीज कनेक्शन खंडीत केल्याने बळीराजा चिंतातूर आहे. शेतक-यांसाठी प्रसंगी मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात दिला. मेळाव्याला वीज ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांसमोरच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले.मेळाव्याला वसंतराव चंदात्रे, कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे, के बी साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा सुनील निकम, पं. स. गटनेते संजय भास्करराव पाटील, जि प सदस्य भाऊसाहेब जाधव, दिनेश बोरसे, सुभाष पाटील, पियुष साळुंखे, ग्राहक पंचायत अध्यक्ष रमेश सोनवणे, रावसाहेब पाटील, नगरसेविका संगीता गवळी, राजेंद्र चौधरी, भास्कर पाटील, मानसिंग राजपूत, नितीन पाटील, डॉ. अर्चना पाटील, बाळासाहेब राऊत, किसनराव जोर्वेकर, रविंद्र केदारसिंग पाटील, धनंजय मांडोळे, विवेक चौधरी, अनिल नागरे, वीज वितरण कंपनीचे अभियंता जि टी महाजन, एच ए जगताप, ए बी गढरी, व्ही व्ही बाविस्कर, जि एस जनोकर, जे बी सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रमेश सोनवणे यांनी केले.यावेळी पुढे बोलतांना आमदार चव्हाण यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवले. ते म्हणाले, ज्यांच्या कडे वीज आहे त्यांना रात्रीची वीज मिळत असल्याने शेतक?्यांचे अतोनात हाल होत आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे जर सर्वसामान्यांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत सरकारने शेतक?्यांना वीज कनेक्शन उपलब्ध न केल्यास थेट मंत्रालयासमोरच एल्गार करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
मेळाव्याचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता यांच्यासोबत बसून ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्याच्या योग्य सुचना देखील अधिका-यांना केल्या. यामुळे मेळाव्याला जनता दरबाराचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळाले.ग्राहकांची समस्या सोडविणे सोयीचे व्हावे म्हणून शहर व तालुक्यातील वीज कंपनीच्या १६ उपविभाग प्रमाणे अधिका?्यांचे टेबल लावण्यात आले होते. त्यात कोणत्या उपविभागात कोणती गावे समाविष्ट आहेत. याचे फ्लेक्स लावले होते. त्यामुळे विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकांची मोठी सोय होत होती. तसेच ग्राहकांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चहा व नाश्त्याची सोय करण्यात आली होती. ६६ तक्रारी, १० तक्रारींचा जागेवरच निपटारामेळाव्यात ६६ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील १० तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्यात तर १७ तक्रारी या येत्या ३ दिवसात सोडविण्यात येतील. १३ तक्रारी येत्या ७ दिवसात सोडविल्या जाणार आहेत. उर्वरित १७ तक्रारी या शासकीय धोरणाशी सबंधित असअसल्याची माहिती कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी दिली. सूत्रसंचालन धनंजय मांडोळे यांनी केले.