जामनेर : कोणत्याही वस्तूची खरेदी करताना त्या उत्पादनाची अखेरची मुदत पाहून दुकानदाराकडून पक्के बिल घ्यावे. भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास या बिलाच्या आधारे ग्राहक दाद मागू शकतो, असे प्रतिपादन तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी बुधवारी बाजार समितीच्या सभागृहात केले. जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला प्रशासनामार्फत व्यापक प्रसिद्धी न केल्याने ग्राहकाविना साजरा झालेला ग्राहक दिन असेच या कार्यक्रमाबाबत म्हटले जात आहे. स्वस्त धान्य दुकानदार, ग्राहक समितीचे सदस्य वगळता कोणत्याही विभागाचा अधिकारी बैठकीस उपस्थित नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे व पंचायत समितीचे माजी उपसभापती नवलसिंग राजपूत यांनी सांगितले की, ग्राहक संरक्षण कायद्याबाबत नागरिकांमध्ये पुरेशी जनजागृती केली जात नाही. सोशल नेटवर्कच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी व्यवहारात ग्राहकांची मोठी फसवणूक होते. ती रोखण्यासाठी कायद्याचा वापर झाला पाहिजे. बाजार समितीचे सभापती तुकाराम निकम, उपसभापती दीपक चव्हाण, पंचायत समितीच्या सभापती संगीता पिठोडे, कृषी अधिकारी रमेश जाधव, राजेंद्र देशपांडे, मूलचंद नाईक, तेजराव ठोंबरे आदी उपस्थित होते.ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास सर्व शासकीय अधिका:यांनी उपस्थित राहण्याबाबत पूर्वसूचना दिलेली होती. तरीही जे अधिकारी गैरहजर राहिले त्यांना त्याबाबत खुलासे सादर करण्यास सांगितले जाईल. -नामदेव टिळेकर, तहसीलदार, जामनेर
ग्राहकांविना ग्राहक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2017 12:14 AM