जळगाव : दूध उत्पादकांना देण्यात येणाºया अनुदान योजनेची मुदत संपल्याने जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने उत्पादकांना देण्यात येणाºया दुधाच्या दरात कपात करण्यात आली असून नवीन दर ११ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. या निर्णयाने गायीच्या दुधाचे दर ४ रुपये प्रती लिटर तर म्हशीच्या दुधाच्या दरा १.४० रुपयांनी कपात केली आहे. यामुळे संघावरील अतिरिक्त बोझा कमी झाला असून याचा ग्राहकांचा कोणताही फायदा होणार नाही.दूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी शासनाच्यावतीने आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिने अनुदान योजना राबविण्यात आली. यामध्ये १ आॅगस्टपासून दूध उत्पादकांना गाईच्या दूधाचा दर २१ रूपयांवरून २५ रूपये अदा करण्याचा निर्णय जिल्हा दूध संघातर्फे घेण्यात आला होता. या योजनेची मुदत ३१ आॅक्टोबर रोजी संपली. त्यानंतर योजनेस मुदतवाढ देण्याबाबत कोणतेही आदेश आले नाहीत. १० नोव्हेंबरपर्यंत वाढीव दर दिल्यानंतर दूध संघाच्यावतीने दर कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गायीच्या दुधाचे दर पूर्ववत २१ रुपये प्रती लिटर करण्यात आले आहेत.या सोबतच म्हशीच्या दुधाच्या फॅटचे दर प्रती किलो २० रुपयांनी कमी केले आहे. आतापर्यंत ५५० रुपये प्रती किलो फॅट दर दिला जात होता. नवीन दरानुसार ५३० रुपये प्रती किलो फॅट दर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे म्हशीच्या दुधाचे दरही ३८.५० रुपये प्रती लीटरवरून १.४० रुपयांनी कमी होऊन ३७.१० रुपये प्रती लीटर भाव दूध उत्पादकांना दिला जाणार आहे.दूध संघात १ लाख ८० हजार लिटर्स गाईच्या दुधाचे संकलन होते. या योजनेमुळे त्यावर प्रतिलिटर ४ रूपये प्रमाणे जादा भाव अदा करीत दूध उत्पादकांना दररोज ९ लाख ५० हजार रूपये मोबदला द्यावा होता. त्यामुळे दूध संघाला तेवढे नुकसान सहन करावे लागत होते.प्रत्येक संस्थेने दुधाचे पेमेंट सभासदाच्या बँक खात्यात वर्ग करण्याचेही सूचित करण्यात आले आहे.
दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या दरात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:09 PM
अनुदान योजनेबाबत मुदतवाढीचे आदेश नाही
ठळक मुद्देगायीच्या दुधात ४ रुपये तर म्हशीच्या दुधात १.४० रुपये प्रती लीटरने कपातदूध संघात १ लाख ८० हजार लिटर्स गाईच्या दुधाचे संकलन