जळगाव : खड्डेमय रस्त्यामुळे तरसोद येथील गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाट अत्यंत बिकट झाली आहे़ पाच वर्षांपासून मंत्री, आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग यांच्याकडे रस्ता दुरूस्तीची मागणी करून सुध्दा काहीही कार्यवाही न झाल्यामुळे अखेर ‘आता तरी देवा मला पावशील का? तरसोदचा रस्ता माझ्यासाठी करशील का?’ अशी भक्तीमय आर्तहाक गणेश भक्त सुनील शिंपी यांनी गणरायाकडे केली आहे़ यासाठी त्यांनी अठराशेच्यावर सायकल वाºया केल्या आहेत.तरसोद म्हटले की गणरायाची आठवण आल्या शिवाय राहत नाही, मात्र गेल्या काही वर्षांपासून तरसोद येथील गणरायाच्या मंदिरापर्यंत जाणाºया रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे़ त्यामुळे किरकोळ अपघात सुध्दा होत आहेत़ भाविकांना पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहेत़त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून गणेश भक्त सुनील शिंपी हे रस्त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी मंत्री, आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी यांच्या वांरवार भेटी घेऊन त्यांना रस्त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी मागणी केली़ पण, रस्त्याच्या दुरूस्तीाबाबत कुठलीही हालचाली झाल्या नाहीत़आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी शिंपी यांनी दोन वेळेस तिरुपती बालाजीला जाऊनही साकडे घातले़ वारीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जसे रस्ते खराब असल्याने सायकल पंक्चर होणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावातील महिला पुरुषांनी केलेली घाण, त्याचा उग्र वास या सर्व गोष्टींमुळे शिंपी अस्वस्थ झाले आहेत़ रस्त्याच्या मागणीच्या लढाई सुनील शिंपी हे एकटेच लढत आहेत़ त्यामुळे आता भाविकांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले आहे़ दरम्यान, पाच वर्षापासून सुस्त असलेल्या प्रशासनामुळे नागरिकांना सुविधा मिळत नसल्यामुळे नाराजी आहे़ १ सप्टेंबर रोजी शिंपी यांच्या वारीला पाच वर्ष पूर्ण होणार आहे़ त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे अनेकांनी सत्कार करण्याचे ठरविले मात्र त्यांनी रस्ता झाल्यानंतरच मी असा सत्कार स्विकारेन असे म्हटले आहे़सुनील शिंपी श्रीराम मंदिराचे सेवेकरीसुनील शिंपी हे जुने जळगावातील श्रीराम मंदिरात सेवेकरी आहेत़ पत्नी व आईचे निधन झाल्यामुळे घरच्या कामांची व मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे़ दरम्यान, गणेश भक्त असल्यामुळे नेहमी ते रोजी तरसोद येथील गणरायाचे दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नाहीत़ त्यांचे अयोध्यानगरात घर आहे़ परंतू, रात्री ते मंदिरातच थांबतात़ अनेक वर्षांपासून ते तरसोद रस्त्याची दुरूस्ती व्हावी म्हणून सायकल वारी करत आहे़पाच वर्षापासून सायकल वाºयासुनील शिंपी यांची नियमित सकाळी रोज ६़१५ वाजेच्या सुमारास जुने जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर ते तरसोद येथील गणपती मंदिरापर्यंती सायकल वारी सुरू असते़ अन् ही वारी गणेश दर्शनासह रस्त्याची दुरूस्ती व्हावी या मागणीसाठी शिंपी करतात़ १ सप्टेंबर २०१३ ते २१ आॅगस्ट २०१८ पर्यंत त्यांनी तब्बल १८१६ सायकल वाºया केल्या आहेत़ अन् जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत ही वारी सुरूच ठेवणार आहेत़ एवढेच नव्हे तर गणरायाच्या दर्शनाशिवाय शिंपी हे जेवणही घेत नाहीत़ मागील वर्षील १६ आॅगस्टला आईचे निधन झाले तरी दररोज अंघोळ करुन मंदिरात न जाता बाहेरून दर्शन घेऊन त्यांनी त्यांची वारी सुरु ठेवली. त्यामुळे या गणेश भक्ताची हार्त हाक प्रशासनाला ऐकू येईल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे़