आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. ३१ - पेट्रोल डिझेल चे दर झपाट्याने वाढत आहे. यामुळे सर्व सामान्य जनता आणि वाहतूक करणारे वाहन मालक बेजार झाले आहे सततच्या पेट्रोल डिझेल दर वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूच्या भावामध्ये वाढ होऊन सर्व सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल चे दर कमी करावेत यासाठी शहरातील विवीध संघटनांच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृहापासुन सायकल रॅली काढुन तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.विश्रामगृहापासुन रॅलीला सुरुवात झाली रॅली स्टेशन रोड मार्गे घोषणा देत तहसील कार्यालय वर धडकली यावेळी तहसिलदार कैलास देवरे यांना निवेदन देण्यात आले सर्व सामाजिक संघटना संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासुन पेट्रोल डिझेल चे दर झपाट्याने वाढत आहे यामुळे सर्व सामान्य जनता आणि वाहतूक करणारे वाहन मालक बेजार झाले आहे सततच्या पेट्रोल डिझेल दर वाढीमुळे जिवनावश्यक वस्तु च्या भावामध्ये वाढ होऊन सर्व सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेल चे दर कमी करावेत पेट्रोल व डिझेल च्या भडक्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे इंधनाच्या दरवाढीने महागाईने कळस गाठला आहे महागाई मुळे जनता बेजार असताना मोदी सरकार चार वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष साजरा करत आहे . इंधनाचे दर हे गगनाला भिडले आहे. सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले असुन इंधन दरवाढीमुळे महागाईचा उच्चांक वाढणार असून सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्किल होणार आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे त्यात भर पडणार आहे यामुळे आमच्या भावना सरकार पर्यंत पोहचवाव्यात लवकरात लवकर पेट्रोल डिझेल चे भाव कमी करावेत अशी मागणी रयत सेना. शेकाप. लोकनेते पप्पुदादा सामाजिक प्रतिष्ठान. लोकसघर्ष मोर्चा. ॐकार मित्र मंडळ .मानवता फाऊंडेशन.यांच्या वतीने करण्यात आली आहे तसे न झाल्यास सर्व संस्था संघटना च्या वतीने चाळीसगाव तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आहे. सायकल रॅलीत रयत सेने चे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, लोकसघर्ष मोर्चाचे अतुल गायकवाड, सोमनाथ माळी, शेकापचे गोकुळ पाटील, किशोर पाटील, लोकनेते पप्पूदादा प्रतिष्ठान चे राहुल पाटील, अप्पा पाटील.नॅशनल कंझुमर फोरम चे खुशाल पाटील .ॐकार मित्र मंडळाचे भाऊसाहेब पाटील.मानवता फाउंडेशन शुभम दायमा सप्निल भोसल, अॅड वाडीलाल राठोड, रयत सेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय कापसे तसेच रयत सेनेचे दिनेश चव्हाण, मुकुंद पवार, सप्निल गायकवाड, दिनेश जगताप, अकाश धुमाळ, गणेश देशमुख, योगेश पाटील. विलास मराठे, किशोर पाटील, गोपाल देशमुख, राकेश आहिरराव, भरत नवले, विजय दुबे, शुभम जाधव, गणेश निवुर्ती पवार , मंगेश देठे विजय पाटील, एकनाथ पाटील, शरद पाटील, ऋषिकेश जगतात, भूषण शिगटे , शुभम मोची, गणेश पाटील, लक्ष्मण पाटील, अतुल घाडगे, बाळासाहेब पाटील यांच्यासह रयत सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
चाळीसगावला निघाली इंधन दरवाढीविरोधात ‘सायकल रॅली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 1:30 PM
विविध संघटनांचा सहभाग
ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन