एरंडोल : गिरणा धरणातून सोडलेले पहिले आवर्तन १८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.दरम्यान, शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणी आव्हाणीच्या पुढे मार्गक्रमण करीत होते. गिरणा नदी पात्रात बेसुमार वाळू उत्खनन झाल्यामुळे १० ते १२ फूट खोल खड्डे भरायला भरपूर पाणी लागले आहे. हे खड्डे पाण्याने भरले अन् वाळूमाफियांचे पाप धुतले गेले अशी टीका जनमानसातून होत आहे.कानळद्यापर्यंत ७५ कि.मी.लांबीच्या गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाल्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले. सदर खड्डे भरण्यासाठी पाणी जास्त लागले. खड्डे भरल्यावर पाणी पुढे सरकत होते. त्यामुळे पाण्याचा वेग मंदावला आहे. एकंदरीत बेसुमार वाळू उपसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जिरले आहे. वाळू माफीया व वाळू चोरांचे खड्डेरुपी पाप पाण्याने भरले गेले व झाकलेही गेले, अशी चर्चा गिरणा नदी काठावरील गावांमध्ये होत आहे.
गिरणेच्या आवर्तनाने झाकले वाळूमाफियांचे पाप....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 6:00 PM
गिरणा नदी पात्रात बेसुमार वाळू उत्खनन झाल्यामुळे १० ते १२ फूट खोल खड्डे भरायला भरपूर पाणी लागले आहे. हे खड्डे पाण्याने भरले अन् वाळूमाफियांचे पाप धुतले गेले अशी टीका जनमानसातून होत आहे.
ठळक मुद्देवाळू चोरीमुळे निर्माण झालेले खड्डे पाण्याने तुडूंबआवर्तनाचा प्रवाह पडला धिमा