अमळनेर, जि.जळगाव : येथील दगडी दरवाजाजवळ सुरू असलेल्या पत्त्याच्या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.सूत्रांनुसार, सुदाम मराठे यांच्या घराच्या तळमजल्याच्या एका बंद हॉलमध्ये कै.केशव शिरसाळे क्रीडा मंडळ जळगाव शाखा अमळनेर नावाने क्रीडा संस्था सुरू आहे. येथे स्पोर्ट क्लबच्या नावाखाली छन्ना मन्ना नावाच्या जुगाराचा खेळ खेळला जातो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने १४ रोजी दुपारी तीनला छापा टाकला. त्याठिकाणी शेख कलीम शेख इस्माईल, ज्ञानेश्वर दगडू बाविस्कर, शेख समसुद्दीन शेख कुतुबुद्दीन, शकील छोटू बागवान, रजाक शेख कादर, अभय श्रीकृष्ण उदेवाल, नितीन अरविंद बोरसे, प्रदीप भरत बिराडे, नितीन रामदास नगराळे, गणेश नंदलाल लोहार, रमेश नारायण बडगुजर, आप्पा तानकू पाटील, पुंडलिक दगडू चौधरी, राजेंद्र छबा वानखेडे, काबील शेख तय्यब, मुकेश शिवदास बिराडे आदी छन्ना मन्ना नावाचा जुगार खेळताना आढळले. त्यांच्याकडून रोख १५ हजार ५० रुपये मिळाले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेतही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे यांच्यासह सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, सुनील दामोदरे, अशरफ शेख निजामुद्दीन, विनोद सुभाष पाटील, रंजीत जाधव, इद्रिस जमशेरखा पठाण ह्या पथकाने केली.
अमळनेरात पत्त्याच्या क्लबवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:51 AM
पत्त्याच्या क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून १६ जणांना ताब्यात घेतले
ठळक मुद्दे१६ जण ताब्यातस्थानिक गुन्हे शाखेने टाकला छापा