अजय पाटीलजळगाव : केळी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. अनेक वर्षांपासून केळीला फळाचा दर्जा देण्याचा घोषणा या लोकप्रतीनिधींकडून केल्या जातात मात्र शासनाकडे कोणताच पाठपुरावा होत नसल्याने अजूनही केळीला फळाचा दर्जा मिळत नाही. केळी उत्पादक शेतकऱ्यांचा या मागणीकडे कोणताही लोकप्रतिनिधी गांभिर्याने लक्ष देत नसल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.‘लोकमत प्रतिनिधी’ने जळगाव ते जळगाव ग्रामीणमधील भोकर-पळसोद दरम्यानच्या केलेल्या प्रवासात बसमधील प्रवाशांचे मत जाणून घेतले.प्रवाशांनी राष्टÑीय मुद्यांपेक्षा स्थानिक मुद्यांनाच लोकसभा निवडणुकीत महत्व देणार असल्याचे सांगितले. सावखेडा खु. येथील राजेंद्र शांताराम पाटील म्हणाले की, गिरणा व तापी नदी खोºयालगत केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी वादळ, गारपीटीमुळे केळीचे नुकसान होते. मात्र, फळाचा दर्जा नसल्याने नुकसान भरपाई त्यामानाने मिळत नाही.पळसोद येथील अनिल पाटील म्हणाले की, केळीसाठी जिल्ह्यात कोल्ड स्टोअरेजची गरज आहे. प्रत्येक निवडणुकीत कोल्ड स्टोअरेज करण्याची केवळ घोषणा केली जाते.राष्टÑीय सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा‘बस’ मध्ये काही महाविद्यालयीन युवकांशी चर्चा केली. भोकर येथील देवेंद्र बडगुजरने सांगितले की,लोकसभा निवडणुकीत स्थानिक मुद्यांपेक्षा राष्टÑीय मुद्यांना महत्व आहे. या निवडणुकीत देशाचे सरकार निवडले जात असल्याने, राष्टÑीय सुरक्षेला महत्व देईल असेच सरकार आमच्यासाठी महत्वाचे आहे.गाढोदा येथील मनोज पाटीलनेही राष्टÑाच्या बाह्यशक्तींना देश विघातक कार्यापासून रोखणाºया मजबूत सरकारची निवडच महत्वाची असल्याचे सांगितले.
राजकीय चर्चांचा रोजचा ‘बस’ प्रवास : केळीला फळाच्या दर्जाची घोषणा कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 1:08 PM