ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 17 - शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दररोज वाढतच असून खाजगी रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. विशेष म्हणजे मनपाच्या आरोग्य विभागाकडे डेंग्यू सदृश अशी नोंद असली तरी खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांचे अहवाल पॉङिाटिव्ह येत असल्याचे चित्र आहे. मनपाकडेदेखील सदृश म्हणून नोंद असलेल्या रुग्णांची संख्या 330वर पोहचली आहे. दरम्यान, स्वाइन फ्लूचा पॉङिाटिव्ह अहवाल नसला तरी नागरिक धास्तावले आहेत तर दुसरीकडे चिकून गुनियाने शहरवासीयांचे शरीर जखडले जात आहे. शहरात गेल्या दीड महिन्यापासून डेंग्यू व इतर आजारांनी मोठय़ा प्रमाणात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यातच पावसामुळे घराशेजारी तसेच इतरत्र साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील महाबळ कॉलनी परिसर, संभाजीनगर, मेहरूण, रामानंदनगर, आदर्शनगर, आयोध्यानगर, वाघनगर, एकनाथनगर यासह विविध भागात यापूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.रामेश्वर कॉलनी परिसरातील एकनाथनगर या भागातही डेंग्यूचे रुग्ण असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. या भागातील काही मुलांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डेंग्यू असल्याचा अहवाल आला. येथील प्रचंड अस्वच्छतेबाबत नागरिकांनी मनपाकडे तक्रार केली, मात्र इकडे कोणीही फिरकले नाही की साफसफाई केली नाही, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या सोबतच वाघनगर, आयोध्यानगर भागातही अशीच स्थिती असून वाघनगर, यशवंतनगर, अयोध्यानगर, शिवकॉलनी, गणपतीनगर परिसरातील गुरूनानकनगर, महाबळ परिसरातील हनुमान कॉलनी या भागात डेंग्यूची लागण झाली असून नागरिकांचे खाजगी रुग्णालयातील अहवालही पॉङिाटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी घरातील एक जण बरा झाली की, दुस:याला त्यांची लागण होत आहे. मनपाकडे 330 रुग्णांची नोंदमनपाच्या आरोग्य विभागाकडे शहरातील विविध भागात 330 डेंग्यू सदृश आजाराचे रुग्ण असल्याची नोंद आहे. दिवसेंदिवस डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत असल्याचे दिसून येत आहे. 14 रोजी 314 असणा:या या संख्येत दोनच दिवसात 16 रुग्णांची भर पडून ही संख्या 330वर पोहचली आहे. डेंग्यू सोबतच शहरवासीय स्वाइन फ्लूच्या भीतीने धास्तावले असून दोनच दिवसांपूर्वी स्वाइन फ्लू सदृश आजाराने एका महिलेचा मृत्यू झाल्याने त्यात भर पडली आहे. चिकुन गुनियादेखील डोके वर काढत असल्याने नागरिक जखडून गेले आहेत. डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर मनपाच्यावतीने शहरात सव्रेक्षण करण्यात येत असून सोबतच अबेटींग करण्यासह फवारणी, धुरळणी केली जात असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 25 कर्मचारी तैनातमनपाचे 25 कर्मचारी शहरात फवारणी, धुरळणी, अबेटिंग करण्यासह डॉक्टरांसोबत काम करीत आहे. 25पैकी 10 कर्मचारी मनपाच्या डॉक्टरांसोबत उपचारासाठी मदत करीत आहे. उपचार नाही, काळजीच पर्यायडेंग्यूसाठी उपचार नाहीत, मात्र लक्षणानुसार उपचार करता येतात. त्यामुळे प्रतिबंध हाच चांगला उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच नागरिकांनी स्वत:देखील काळजी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. घरातील अथवा परिसरातील साचलेले पाणी नष्ट करा, कोरडा दिवस पाळा अशा विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.
शहरात डेंग्यू सदृश आजाराचे 330 रुग्ण असून उपाययोजना केल्या जात आहे. संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात येऊन या बाबतची माहिती वरिष्ठांकडे पाठविली जाते.- डॉ. राम रावलाणी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा.
डेंग्यूच्या पाश्र्वभूमीवर शहरात फवारणी, धुरळणी तसेच अॅबेटिंग केले जात आहे. यासाठी 25 कर्मचारी आहेत. - एस.व्ही. पांडे, जीवशास्त्रतज्ज्ञ, मनपा.