लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात बाधितांचे प्रमाण घटले असून मंगळवारी एकूण तपासण्यांमध्ये १.४१ टक्के रुग्ण बाधित आढळून आले आहेत. शहरात नवे दोन रुग्ण आढळून आले असून ग्रामीण मध्ये १ मृत्यू झाला आहे. जळगाव ग्रामीणमध्ये ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या घसरली असून मंगळवारी सर्वच तालुक्यात दहापेक्षा कमी रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. ही रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेतील निच्चांकी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. जळगाव ग्रामीणमध्ये ५० वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील १८ व ग्रामीणमधील ५ रुग्ण बरे झाले आहेत.
अशा चाचण्या असे बाधित
आरटीपीसीआरचे आलेले अहवाल : १९४१, बाधित ८, प्रमाण ०.४१ टक्के
ॲन्टीजन : २५९०, बाधित ५६, प्रमाण २.१६ टक्के
आरटीपीसीआर चाचण्या : १५५०