तोंडापूर ता.जामनेर : तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे.तोंडापूर गावाला लागुनच मोठे धरण आहे. पावसाळ्यात धरण भरल्यावर सर्वच शेतकºयांना त्याचा लाभ होत असे. यावर्षी धरणात मुबलक साठा वाढणार या आशेने तोंडापूर येथील १०० पेक्षा जास्त शेतकºयांनी शेतात प्रत्येकी पंधरा ते पंचवीस हजार केळी खोडांची लागवड केली. केळी बागांना पुरेशे खतपाणी घातल्यानंतर बाग काटणीवर येण्याआधीच पाण्याअभावी सुकत आहेत. काहींची बाग लहान असतानाच मोठ्या झाडांना वाचवायचे की लहान बागांना या चिंतेने लाखो रुपये खर्च करीत लहान बागांना वाºयावर सोडण्याची वेळ आली.काही शेतकºयांनी केळी बागांवर नांगर चालविला आहे.गावातील सुनील कालभिले यांची दहा हजार बाग, जगदीश पाटील यांची पंधरा हजार, डी.के.पाटील यांची पंचवीस हजार केळीबाग, जाकिर पटेल यांची सहा हजार, संतोष ढेपले यांची चार हजार बाग पाण्याअभावी सुकत असल्याची माहिती शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रत्येकाच्या शेतात विहीर, बोअरवेल पाण्याची सर्व साधने असताना यावर्षी पावसाने दांडी मारल्याने धरण भरलेले नाही. सद्य:स्थितीला धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. जमिनीची पाणी पातळी खोल गेल्याने शेतातील विहिरी व बोरवेल कोरड्या पडल्या आहे. आॅक्टोबर महिन्यात ही स्थिती आहे तर पुढे काय होणार ही चिंता शेतकºयांना सतावत आहे.'माझी पंचवीस हजार केळीची बाग पाण्याअभावी पूर्णपणे कोमजली. यात मला चाळीस लाखांचा फटका बसणार आहे. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. माझ्यासारखे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी.- डी.के.पाटील, प्रगतीशील शेतकरी, तोंडापूर
धरण उशाशी अन् कोरड घशाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 3:14 PM
तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे.
ठळक मुद्देतोंडापूर परिसरात केळी बागा सुकल्यायंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळतोंडापूर धरणात शून्य टक्के जलसाठा