मुक्ताईनगरातील सागर सीड्स या कृषी दुकानातून बायो ३०३ कंपनीचे दमणचे कीटकनाशक कुलकर्णी यांनी घेतले होते. मिरची पिकावर फवारणी केली असता लाखो रुपयांच्या मिरचीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी या शेतकऱ्याने पंचायत समितीचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे बोगस कीटकनाशक देणाऱ्या दुकानदाराची तक्रार केली आहे. कृषी अधिकारी यांनी त्या कीटकनाशकाच्या बाटलीचे सॅम्पल घेण्यासाठी त्या दुकानात गेले असता, दुकानात ते कीटकनाशक शिल्लक नसल्याचे तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी सांगितले.
शेतकऱ्याला दिलेल्या बिलावर लॉट नंबर नसल्याने तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी त्या दुकानदाराला नोटीस बजावली असून, तालुका समिती याप्रकरणी तपास करणार आहे. तसेच नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करण्यात येणार असल्याचे पंचायत समितीचे कृषी अधिकारी मोरे यांनी सांगितले.