चिनावल : रावेर तालुक्यातील कोचूर, चिनावल, वडगाव, कुंभारखेडा, रोझोदा, सावखेडा परिसरात १९ रोजी सायंकाळी सहाला जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या झटक्याने एका क्षणात हिरावला गेला आहे. यामुळे शेतकºयांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.ऐन कापणीच्या मार्गावर असतानाच या पावसाने व वादळाने ज्वारी, मका व केळी कपाशी अक्षरश: उन्मळून पडल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.महसूल व कृषी विभागाने या नुकसानी ची त्वरित दखल घेऊन पंचनामे करावे व शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी नुकसानग्रस्त शेतकºयांनकडून मागणी होत आहे.आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. सरसकट पंचनामा कराल कोणताही शेतकरी वंचित राहू नये अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.अनेक गावात वीजपुरवठा गायबअतिशय वेगाने आलेल्या वादळी वारा व पावसाळ्यामुळे मोठे वृक्ष यांसह विजेचे खांब उन्मळून पडले. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आह.े उशिरा रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे नुकसान : अनेक गावात वीज गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 3:59 PM