जळगाव- निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या ७९ दांडी बहाद्दर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी दिली़विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी एरंडोल येथील दा.दि.शं.पाटील महाविद्यालयात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण वर्गासाठी १५१७ कर्मचा-यांना बोलविण्यात आले होते़ मात्र, त्यापैकी ७९ कर्मचारी प्रशिक्षण वर्गाला गैरहजर राहिले़ दरम्यान, निवडणुकीच्या विविध बाबींबाबत विनय गोसावी यांनी उपस्थित कर्मचाºयांना मार्गदर्शन केले तर तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांनी सुध्दा मार्गदर्शन केले़ मात्र, प्रशिक्षणासाठी विविध शासकीय व निमशासकीय विभागाच्या कर्मचा-यांना पुर्व सुचना देण्यात आल्या तरी सुद्धा ७९ कर्मचारी गैरहजर राहिले. या कर्मचाºयांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे़