जळगाव : गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात प्रचंड तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पुढील दोन दिवसात जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.शनिवारी राज्यातील पुणेसह इतर भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मध्य महाराष्ट्र ते विदर्भ व कर्नाटकपर्यंत चक्रवाती क्षेत्र निर्माण झाल्यामुळे विदर्भासह जळगाव व धुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शनिवारी देखील जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण पहायला मिळाले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे तापमानात कोणतीही घट झाली नव्हती. पारा ४३ अंशावर स्थिर होता. तर हवेचा दाब कमी झाल्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. दरम्यान, जिल्ह्यात पाऊस झाल्यास दोन दिवसच तापमानात काही अंशी घट कायम राहणार असून, पुन्हा तापमानाचा पारा वाढेल असा अंदाज देखील भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.१५ ते १७ पर्यंत पावसाचा अंदाजदोन दिवसांपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत असले तरी पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. १५ ते १७ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असून, ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील २० ते ३० किमी प्रतितास राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आता अवकाळी पाऊस झाल्यास शेतीला फारसे नुकसान होणार नसून, केवळ वाºयाचा वेग जास्त राहिला तर केळीचे नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.सध्या शेतकºयांकडून खरीप हंगामासाठी मशागती सुरु झाल्यामुळे अवकाळी पावसाचा फायदाच होणार असल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे.का तयार झाली पावसाची स्थितीदेशभरात तीन ठिकाणी चक्रवाती स्थिती तयार झाली आहे. यामध्ये बिहार व उत्तरप्रदेशलगतचा भाग आहे. तर दुसरी स्थिती मेघालय ते अरुणाचल प्रदेश मध्ये तर तिसरी स्थिती ही मध्य महाराष्ट्र , विदर्भ व कर्नाटक लगत तयार झाली आहे.त्यातच मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटकपर्यंतच्या कोमोरिन क्षेत्रादरम्यान हवेच्या वेगात अनियमितता आढळून येत असून, त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, यामुळे पावसाची शक्यता तयार झाली आहे.