शिरसोली : अतिदाबामुळे डीपीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शिरसोली येथील निम्मे गाव दोन दिवसांपासून अंधारात आहे. तक्रार करूनही नवीन डीपी बसविण्यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेण्यात येत असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी रहिवाशांतर्फे करण्यात येत आहे.शिरसोलीतील चिंचपुरा भागातील महावितरणच्या विद्युत डीपी वर अतिदाबामुळे मोठा बिघाड झाला आहे. यामुळे गुरुवारी सकाळपासून चिंचपुरा, पाटीलवाडा व वाणी गल्लीतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.वीजपुरवठा खंडित झाल्यावर नागरिकांनी लागलीच घटनेची माहिती स्थानिक महावितरणच्या कर्मचाºयांना दिली होती. कर्मचाºयांनी लागलीच या ठिकाणी येऊन दुपारपर्यंत नवीन डीपी बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, संध्याकाळपर्यंतदेखील नवीन डीपी बसविण्यात आली नव्हती. शुक्रवारी दुसºया दिवशी पुन्हा येथील रहिवाशांनी महावितरणचे कर्मचारी व जळगाव येथील अधिकाºयांशी संपर्क साधला. यावेळीदेखील सायंकाळपर्यंत डीपी बसविण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र, सायंकाळीदेखील डीपी बसविण्यात आली नव्हती. दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
शिरसोलीत दोन दिवसांपासून अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 11:56 AM