जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : खान्देशातील कुस्तीची 'पंढरी' म्हणून चाळीसगावचा सन्मान केला जातो. येथील मल्लांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपली रग दाखवत आखाडे गाजवले. कुस्तीची ही परंपरा आणखी पुढे नेण्यासाठी औरंगाबाद रोड स्थित सुसज्ज अद्ययावत दुमजली व्यायामशाळा बांधण्याचा मनोदय चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. यावेळी रघुवीर व्यायामशाळेच्या अध्यक्षपदी अक्षय श्यामसुंदर अग्रवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.रघुवीर व्यायामशाळेला मल्ल विद्येची मोठी परंपरा असून, गेल्या अनेक वषार्पासून गुढी पाडव्याला कुस्त्यांची दंगलही भरवली जाते. यादंगलीत राज्यभरातील नवोदित व नामवंत मल्ल हजेरी लावत असतात. व्यायामशाळेची इमारत नव्याने बांधण्यात यावी, अशी इच्छा मल्ल आणि व्यायामप्रेमींनी बोलून दाखविल्यानंतर नारायणदास अग्रवाल यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला.बुधवारी व्यायामशाळेच्या प्रांगणात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतच अग्रवाल यांनी सुसज्ज दुमजली व्यायामशाळा बांधून देण्याची घोषणा केली.सुरुवातीला चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व उद्योजक रमेशचंद्र अग्रवाल व व्यायामशाळेचे विद्यमान अध्यक्ष गोपाळदास अग्रवाल यांचे नुकतेच निधन झाल्याने श्रद्धांजली वाहण्यात आली.बाजार समितीचे माजी सभापती व शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, चारुदत्त पवार यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी शेख गफुर पैलवान, योगेश अग्रवाल, विजय शर्मा यांनीही मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष अक्षय अग्रवाल यांनी आपण सोपवलेली व्यायामशाळेची जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने निश्चितच यशस्वी करू, अशी ग्वाही दिली. बैठकीला संजय देशमुख, सुभाष गायकवाड, दिलीप गायकवाड, विठ्ठल धुमाळ, साहेबराव अगोणे, बिस्मिल्ला शेख, गुलाब आगोणे, सुरेश गायकवाड, जीभाऊ येवस्कर, प्रभाकर आगोणे, शिवाप्पा गवळी, मधुर अग्रवाल, दिनेश गायकवाड, बिस्मिल्ला शेख, भिला आगोणे, बी. बी. सोनवणे रमेश रोकडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव रमेश जानराव यांनी केले.
चाळीसगावी बांधणार अद्ययावत दुमजली व्यायामशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 2:58 PM
खान्देशातील कुस्तीची 'पंढरी' म्हणून चाळीसगावचा सन्मान केला जातो. येथील मल्लांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपली रग दाखवत आखाडे गाजवले.
ठळक मुद्देनारायणदास अग्रवाल यांनी दिलेली माहितीरघुवीर व्यायामशाळेच्या अध्यक्षपदी अक्षय अग्रवाल यांची निवड