मुक्ताईनगर : मलकापूरच्या कोरोना बाधीत ६५ वर्षीय महिलेचा तालुक्यातील मन्यारखेडा कनेक्शन आढळल्याने तालुक्यात खळबळ माजली असतांना २७ रोजी सकाळी ७ वाजताच सदर महिलेची कन्या शहरातील प्रभाग क्र १२ मध्ये राहत असल्याची माहिती उघडकीस आली . यासंदर्भात प्रभागाचे नगरसेवक संतोष मराठे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांना माहिती मिळताच त्यांनी कोरोना बाधित महिलेची कन्या व त्यांचे दोघे मूल यांना कोरोना चाचणी करून घेण्याच्या सूचना केल्या. सदर कुटुंबियांनी जागरूकता दाखवत लागलीच कोरोना चाचणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गाठले.त्यानुसार त्यांना लागलीच रुग्णवाहिकेतुन पुढील चाचणी साठी जळगांवला रवाना करण्यात आले. दरम्यान सदर महिलेची कन्या व दोन नातू यांना कोरोना संदर्भातले कोणतेही लक्षण दिसत नसले तरी तिघांना सायंकाळी होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश राणे यांनी दिली .डॉक्टरबद्’ल अफवामुक्ताईनगराच्या दाराशी कोरोना पोहोचला असतांना अफवाचे पेव फुटले आहे. जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देणाऱ्या शहरातील हृदय रोग तज्ञ डॉ एन.जी. मराठे यांना कोरोना लागण झाल्याची अफवा रविवारी रात्री पासून पासरविण्यात आल्या. तर दुसरीकडे अफवांकडे लक्ष न देता रुग्ण सोईसाठी डॉ. मराठे यांनी नेहमी प्रमाणे रुग्ण सेवा सुरू होती, तर त्यांच्या कुटूंबियांना मनस्ताप सहन करावा लागला.
कोरोनाबाधित महिलेच्या मुलीचा रहिवास मुक्ताईनगरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 9:51 PM