गणेश बी.पाटीलउटखेडा, ता.रावेर : कोजागरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरूवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो. वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्व आहे. गावातील श्रीराम मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधूर स्वर निनादत असतो.एकेकाळी गावातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करीत. त्याचे प्रमाणही मोठे होते. परंतु अलीकडच्या काळात काकड आरतीची गर्दी ओसरू लागली आणि काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरूणांची संख्याही कमी झाली. आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष, महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात. गावातील श्रीराम मंदिरात काकड आरतीमध्ये टाळ, मुदुंग यांच्या तालावर अभंग सादर होतात. आताही अनेक गावांमध्येही परंपरा अखंडपणे सुरू आहे. पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात. मंदिरातील काकड आरती आटोपल्यानंतर भाविक ह्यजय जय राम कृष्ण हरीह्णचा गजर करीत टाळ-मुदुंगाच्या तालावर घालतात.चातुर्मासात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निंद्रेमध्ये असतात. त्यांना उठविण्यासाठीही काकड आरतीची परंपरा असल्याचे हभप श्यामजी महाराज यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले. आरती दरम्यान तीन मंगलचरण, काकडा आरतीचे अभंग, भूपाळीचे अभंग, पूजेची ओळ, सातवी मालिका, वासुदेव आंधळा आदीसह विठ्ठलाची आरती होते.या एक महिन्याच्या उत्सवात श्रीराम मंदिराचे पुजारी हभप श्यामजी महाराज, मोहित महाराज, सुधाकर पाटील, रामदास पाचपोळे, सुभाष पाटील, प्रभाकर पाटील, रमेश महाजन, जिजाबराव पाचपोळ, प्रकाश बोरनारे, संतोष महाजन या सर्वांच्या उपस्थित अशा काकड आरतीची ३० नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेला सांगता होणार आहे.धार्मिक महत्व : हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती म्हणजेच कापसाची तुपात भिजवलेली ज्योत ओवाळली जाते म्हणून याला काकडा किंवा काकड आरती असे म्हणतात.
उटखेडावासीयांची पहाट उगवते मंजुळ स्वरांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 3:03 PM
गावातील श्रीराम मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधूर स्वर निनादत असतो.
ठळक मुद्देहिंदू धर्मात कार्तिक महिन्याला खूप महत्वहा महिना श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पितया महिन्यात पूजा आणि उपवास केल्याने कष्ट होतात दूर