जळगाव : औरंगाबाद येथे पुतणीच्या लग्नासाठी गेलेल्या नदीम अख्तरअली काझी (४६) यांचे घर चोरट्यांनी भरदिवसा फोडून ४० हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना आरटीओ कार्यालयाजवळ आदर्शनगरात सोमवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काझी कुटुंबीय पुतणीच्या लग्नासाठी १३ रोजी सकाळी ११ वाजता घरबंद करुन औरंगाबादला गेले होते.१५ रोजी भरदुपारी चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून ऐवज लांबविला. दरम्यान,चोरी करुन भिंतीच्या कुंपनावर उडी मारुन पसार होणारे चोरटे काझी यांच्या घरा समोरील रहिवासी प्रणिता भंडारी यांना दिसले. त्यांनी लागलीच सायंकाळी हा प्रकार काझी यांच्या वहिनी आबेदा यांना कळविला.लग्न सोहळा अटोपून काझी कुटुंबीय सोमवारी जळगावी परतले. घरातील लाकडी कपाटातून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. तसेच कपाटातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट, ५ ग्रॅम सोन्याचे टॉप्स, ५ ग्रॅम वजानाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
आदर्श नगरात दिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 8:58 PM