ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26- खेडी शिवारातील एका शेतातील भूजल सव्रेक्षण आणि विकास यंत्रणेच्या विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या उघडकीस आली़ मृतदेहाची दरुगधी आल्याने हा प्रकार उघड झाला. नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळविली़ त्यानंतर पट्टीच्या पोहणा:याच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला़ पोलिसांच्या प्राथमिक तपासात मयत वेल्डींग कामगार असून गोपाळ मनोहर चित्ते (वय-40, रा़खेडी, मूळ रा़ मुंबई) असे त्याचे नाव निष्पन्न झाले आह़े जुने जळगावातील रहिवासी दीपक प्रकाश महाजन यांचे जळगाव-भुसावळ महामार्गालगत खेडी शिवारात शेत आह़े या शेतात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत भूजल सव्रेक्षण आणि विकास यंत्रणेची 13़20 मीटर खोल निरिक्षण विहिर आह़े एमआयडीसी पोलिसांनी शेतमालकाला दिली माहितीपरिसरात दरुगधी पसरली होती़ शेतालगत परिसरातील दुकानदार त्रस्त होत़े यातील एका दुकानदाराला शंका आल्याने त्याने विहिरीजवळ पाहणी केली असता त्याला या विहिरीत मृतदेह तरंगतांना आढळून आला़ त्याने तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रकाराबाबत माहिती दिली़ त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अतुल वंजारी, बशीर तडवी, अशोक पाटील हे कर्मचारी घटनास्थळी आल़े कर्मचा:यांनी संबंधित शेतमालकाचा संपर्क मिळविला व त्यांनाही मृतदेहाच्या प्रकाराबाबत माहिती दिली़वाहनासह नागरिकांच्या गर्दीने वाहतूक विस्कळीतमृतदेहाबाबत माहिती वा:यासारखी पसरली़ त्यानुसार परिसरातील नागरिकांसह महामार्गावर ये-जा करण्या:या नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती़ महामार्गालगत बेशिस्तपणे वाहने उभे करुन नागरिक गर्दी करत होत़े यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती़अतुल वंजारी यांच्यासह कर्मचा:यांनी परिसरातील दुकानदाराची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला़ यात काही दुकानदारांची ओळख पटविली़ टीव्ही टॉवरजवळील सरदारजीच्या वेल्डींगच्या दुकानदारावर कामाला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी दुकानमालकाकडून माहिती घेतली असता गोपाळ मनोहर चित्ते असे त्याचे नाव असून तो मूळ मुंबईचा रहिवासी आह़े चार ते पाच दिवसांपासून तो बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाल़ेदोन तासांच्या प्रयत्नांनंतर काढला मृतदेहमृतदेह बाहेर काढण्यासाठी तांबापुरा परिसरातील पट्टीचा पोहणारा रवी हटकर, इब्राहीम खाटीक, सागर गोसावी, शोएब शेख नुरुद्दीन यांना पाचारण केल़े 11 वाजेला मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात झाली़ रवी हटकर विहिरीत उतरला़ इतरांनी ताडपत्रीला दोर बांधून विहिरीत सोडली़ मृतदेह कुजलेला असल्याने हाती लागत नव्हता़ अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर हटकर याने मृतदेह सोडलेल्या ताडपत्रीत टाकला़ यानंतर विहिरीच्या बाहेर असल्याने साथीदारांनी तो वर ओढून तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला़ रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला़