सावदा, ता.रावेर : येथील आ.गं. हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षकाची विद्यार्थ्यांनीच निवड केली आहे. गेल्या २२ वर्षांपासून सेवारत असलेल्या या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव संजय मोतीराम महाजन असे आहे.सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टने शाळेला एक पत्र दिले होते. संस्था किंवा अन्य कोणी न निवड करता, रोज ज्यांच्याशी संपर्क येतो अशा विद्यार्थ्यांनीच आपल्याला प्रिय असलेल्या अर्थात ‘विद्यार्थी प्रिय’ शिक्षकाची निवड करायची ठरले. त्यात जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी संजय महाजन यांचे ‘विद्यार्थी प्रिय’ शिक्षक म्हणून नाव लिहिले आणि या शिक्षकाचा ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला.या शिक्षकाने पोलिओ लसीकरण, प्लॅस्टिक बंदी, वृक्षारोपण यासह इतर सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यासाठी पदरमोड करून जनजागृतीही केली आहे व करतात. अशा या शिक्षकाचा सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सपत्नीक सन्मान करण्यात आला.सतपंथ रत्न आचार्य जनार्दन महाराज यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सत्कार झाला. ते आपल्या पुरस्काराचे श्रेय त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार, संस्थाचालक, मुख्याध्यापक व सर्व सहकारी बंधू-भगिनी व विद्यार्थ्यांना देतात. हा पुरस्कार ते आपल्या विद्यार्थ्यांना समर्पित करतात.
प्रिय शिक्षकाची विद्यार्थ्यांनीच केली निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 4:02 PM
आ.गं. हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षकाची विद्यार्थ्यांनीच निवड केली आहे.
ठळक मुद्दे सावदा येथे विद्यार्थ्यांचा उपक्रमसतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सपत्नीक सन्मान