जळगाव : महाबळेश्वर येथे घोडेस्वारी करताना शहरातील गिरणा टाकी परिसरातील रहिवासी व व्यावसायिक दिलीप मोतीलाल दहाड (६२) हे अचानक खाली पडले. डोक्याला मार लागल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २० रोजी घडली.दिलीप दहाड हे कुटूंबीय आणि मित्र परिवारासह महाबळेश्वर येथे गेले होते़ २० तारखेला सायंकाळी ७़३० वाजेच्या सुमारास महाबळेश्वर येथे घोडेस्वारी करीत असताना त्यांचा तोल जाऊन ते जमिनीवर कोसळले. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते़ दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला़ यावेळी कुटूंबीयांनी एकच आक्रोश केला़ त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ९ वाजता राहत्या घरून काढण्यात येणार आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे़ किरण व संजय दहाड यांचे ते मोठे बंधू तर ललित दहाड यांचे वडिल होत. दिलीप यांचे बी.जे. मार्केटमध्ये फोमचे दुकान आहे.
घोड्यावरुन खाली पडल्याने जळगावच्या व्यावसायिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:16 PM