एरंडोल : येथुन सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वसंत चौधरी यांच्या शेतातील विहिरीत सुमारे अडीच महिने वयाचे नीलगायीचे वासरु विहिरीत पडून दगावल्याची घटना बुधवारी रात्री घडली.३१ आॅक्टोबर रोजी गुरुवारी सकाळी शेतमालक यांचा मुलगा राकेश चौधरी याच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर राकेश याने एरंडोल येथील वनक्षेत्राचे कार्यालय गाठले असता कार्यालय बंद आढळुन आले असता त्याने त्यांचे मित्र प्रा.सुधीर शिरसाठ यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी आपल्या भ्रमणध्वनिवरून वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. पुन्हा सुमारे दीड ते दोन तासांच्या अंतराने अकरा वाजता फोन केला असता त्यांनी फोन उचललला तेव्हा त्यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली.श यावेळी घटनास्थळी वनरक्षक शिवाजी माळी, वनपाल सुनिल पाटील यांनी वन मजुरांच्या सहाय्याने निलागयीच्या वासरला विहिरीच्या बाहेर काढले व डॉ.संजय पाटील यांनी त्याचे जागेवरच शवविच्छेदन केले.यानंतर शेताच्या बांधावर या वसराला पुरण्यात आले. विशेष म्हणजे यावेळी वनक्षेत्रपाल बी.एस.पाटील हे घटना स्थळी आलेच नाहीे. दरम्यान सदर घटना कशी घडली? हे मात्र समजू शकले नाही.