आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - वाल्मीकनगरात विवाहसोहळा आटोपल्यानंतर मंडप काढताना विजेचा शॉक लागल्याने मयूर मंगल पवार (१४, रा. निम. ता. अमळनेर ) या मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेली माहिती अशी की, सुट्या असल्याने मयूर पवार हा बांभोरी येथे मामा देविदास मधुकर नन्नवरे यांच्याकडे आईसोबत गेल्या ८ ते १० दिवसांपासून आला होता. मंगळवारी वाल्मीकनगरातील शाळेच्या मैदानावर लग्न होते. तेथे बांभोरी येथील मंडप मालकाचा मंडप टाकण्यात आला होता. त्यामुळे बांभोरी येथे आलेला मयूर हा गावातील काही तरुणांसोबत मंडप काढण्यासाठी वाल्मीकनगरात आला होता. यावेळी अचानक विजेचा धक्का लागल्याने मयूर जमिनीवर कोसळला. हा प्रकार मंडप काढणाऱ्या तरुणांच्या लक्षात येताच त्याला तत्काळ खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.जिल्हा रुगणालयात आक्रोशघटनेची माहिती कळताच वाल्मिकनगर व बांभोरी येथील नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेवून हळहळ व्यक्त केली. या वेळी मयूरच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. दरम्यान वैद्यकीय अधिकाºयांनी मुलाचा विजेच्या धक्याने तर नातेवाईकांनी उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला.
मंडप काढताना विजेच्या धक्याने जळगावात मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 12:30 PM
नीम येथील रहिवासी
ठळक मुद्देमामांचा प्रचंड आक्रोशजिल्हा रुगणालयात आक्रोश