जळगाव/नशिराबाद : कोरोनाचा संसर्ग वाढतच असून कोरोनाने जळगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शिरकाव केला आहे़ तालुक्यातील भोकर व नशिराबाद या ठिकाणी दोघा पुरूषांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात दोघांचाही मृत्यू झाला.भोकर येथील ६५ वर्षाच्या वृद्धाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता़ लक्षणे नव्हती परंतु शंका म्हणून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते़ ते अहवाल रात्री पॉझिटीव्ह आले़ यासह नशिराबादच्या ६५ वर्षीय वृद्धांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते़ त्यांचाही शनिवारी रात्री मृत्यू झाला व त्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे़ ग्रामीण आरोग्य यंत्रणा नशिराबाद येथे दाखल झालेली आहे़ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व कंटेन्मेंट झोन ठरविणे आदींसह उपाययोजना सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ संजय चव्हाण यांनी दिली़नशिराबादला परिसर सीलनशिराबाद येथील मृत्यू झालेल्या वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवार सकाळपासूनच यंत्रणा कामाला लागली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून परिसर सॅनिटाईज करण्यात आला.बाधितांचा पत्ता सापडेनाकोरोना रुग्णालयातील प्रयोगशाळेत काल ३२ नमुन्यांपैकी १४ नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते़ मात्र, रविवारी दुपारपर्यंत यातील पाच जणांचा पत्ता प्रशासनाला सापडले नव्हते. शिवाजीनगरातील बाधिताबाबतही संभ्रम कायम होता़ रात्री आढळून आलेल्या बाधितांमध्ये भोकर, ता़ जळगाव, नशिराबाद, ता़ जळगाव यांच्यासह अन्य एक जळगाव, भुसावळ ४ व पहूर एक सहा अहवालांची माहिती रविवारी दुपारपर्यंत समोर आलेली नव्हती़ आधीच अहवालांना विलंब त्यात निवासाचा थांगपत्ता न लागणे या बाबी संसर्ग वाढविण्यास अधिक धोकादायक ठरू शकतात अशी भीती वर्तविण्यात येत आहे़
नशिराबाद, भोकर येथील कोरोना बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 1:23 PM