वडगाव लांबे, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : करगाव, ता.चाळीसगाव येथील शेतकरी बापू जोहरसिंग पवार (वय ५२) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.बापू पवार व त्यांचा मुलगा हे वरठाण, ता.सोयगाव येथून गुरुवारी रात्री उशिरा आले. त्यांची बैलजोडी शेतात बांधलेली होती. रात्री उशीर झाल्याने ते सकाळी सात वाजता बैलजोडीला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेले. परंतु पाणी पाजता पाजता त्यांचा तोल जाऊन ते शेजारच्या अग्रवाल यांच्या विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना घरी येण्यास उशीर झाल्याने पुतण्या छोटू पवार त्यांना पाहण्यासाठी गेले असता ते विहिरीत पडलेले आढळून आले.तो तसाच घाबरलेल्या अवस्थेत घराकडे पळत सुटला. त्यानंतर गावातील भाऊबंदकी, तसेच गावकरी पळत विहिरीकडे आले. मग गावातील पोलीस पाटील यांना कळवण्यात आले. सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या आठवड्यात त्यांच्या भावजाईचे निधन झाले होते. त्या दु:खातून सावरत नाही तोच ही घटना झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:05 AM
करगाव, ता.चाळीसगाव येथील शेतकरी बापू जोहरसिंग पवार (वय ५२) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
ठळक मुद्देदोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेलेले असताना रात्री उशिरा परतलेदुसºया दिवशी झाला त्यांचा दुर्दैवी अंत