आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ८ - कार व दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रा.डॉ.महेंद्र गुणवंतराव सोनवणे (वय ३९, रा.पांडूरंग नगर, खोटे नगर मुळ रा.हातेड, ता.चोपडा) यांचा सोमवारी दुपारी उपचार सुरु असताना शहरातील खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. प्रा.सोनवणे यांचा अक्षयतृतीयेला पिंप्री, ता.धरणगाव गावाजवळ अपघात झाला होता. १९ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती.धनाजी नाना महाविद्यालयात प्राध्यापकयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील धनाजी नाना महाविद्यालयात प्राध्यापक असलेले महेंद्र सोनवणे हे धरणगाव येथे खासगी काम असल्याने अक्षयतीयेला १८ एप्रिल रोजी मित्र अनिल कुवर यांना सोबत दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.टी.४४००) धरणगावला जात असताना दुपारी साडे तीन वाजता पिंप्री गावाजवळ शिरीष मालु यांच्या शेताजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र.एम.एच.२९ जी.५४९) जोरदार धडक दिली होती.त्यात प्रा.सोनवणे यांच्या पायाला व मांडीला फ्रॅक्चर झाले होते तर कुंवर हे देखील जखमी झाले होते. दोघांना १०८ या रुग्णवाहिकेतून जळगाव शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सोमवारी दुपारी दीड वाजता प्रा.सोनवणे यांची प्राणज्योत मालवली.पत्नी मू.जे.महाविद्यालयात प्राध्यापकप्रा.सोनवणे यांच्या पत्नी प्रतिभा सोनवणे या मू.जे.महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. मुलगी गौरी चवथीला शिक्षण घेत आहे तर मुलगा जयदीप (वय ४), आई, वडील व भाऊ असा परिवार त्यांच्या पश्चात आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह हातेड येथे नेण्यात आला. दरम्यान, या अपघात प्रकरणी २१ एप्रिल रोजी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. सहायक फौजदार लालसिंग पाटील गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
जळगावच्या अपघातातील जखमी प्राध्यापकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:12 PM
अक्षयतृतीयेला झाला होता अपघात
ठळक मुद्दे१९ दिवस मृत्यूशी झुंजपत्नी मू.जे.महाविद्यालयात प्राध्यापक