जळगाव : खान्देश सेंट्रलच्या प्रवेशद्वाराच्या भींतीवर बॅनर लावत असताना तोल जाऊन खाली पडल्याने श्यामराव बापुराव लकडे (वय ५५, रा.कांचन नगर, जळगाव) या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. घटनेनंतर तब्बल अर्धा तास मृतदेह जागेवरच पडून होता.श्यामराव लकडे व सुनील परदेशी (मिस्तरी) रा.कांचन नगर हे दोन्ही जण खान्देश सेंट्रल मॉलच्या प्रवेशद्वाराच्या इमारतीवर सुयश फूड यांचे जाहिरातीचे बॅनर लावत होते. त्यावेळी श्यामराव यांचा तोल गेल्याने ते जमिनीवर पडले. ५० फूट अंतरावरुन पडल्यामुळे डोक्याचा चेंदामेंदा होऊन ते जागीच गत प्राण झाले. हा प्रकार पाहिल्यानंतर सुनील परदेशी हा प्रचंड घाबरला व तेथून लगेच निघून गेला. खान्देश सेंट्रल येथे सुरक्षा रक्षक असलेल्या रेखा जाधव यांच्यासमोरच ही घटना घडली. त्यांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. जिल्हा रुग्णालयात मृतदेह नेल्यावर तेथे ओळख पटली.
जळगावात बॅनर लावताना ५० फुट उंचीवरुन पडून मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 10:22 PM
खान्देश सेंट्रलच्या प्रवेशद्वाराच्या भींतीवर बॅनर लावत असताना तोल जाऊन खाली पडल्याने श्यामराव बापुराव लकडे (वय ५५, रा.कांचन नगर, जळगाव) या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
ठळक मुद्देखान्देश सेंट्रल मधील घटनाअर्धा तास मृतदेह जागेवरच पडूनपोलिसांनी हलविला मृतदेह