सकाळी झोप उघडल्यानंतर घडय़ाळ पाहिल्यावर सकाळचे पाऊणेसात वाजले होते. वाटले फिरायला जाण्याची वेळ तर निघून गेली. मनात आले ड्रायव्हर तर साडेसात वाजता येईल, पाच-दहा मिनिटं अजून झोपून घेऊ म्हणून परत पडलो. पडल्या पडल्या एक विचार आला तो टोकाचा. खोडकर जरी असला तरी एका सत्याची जाणीव करण्याचा. तो म्हणजे आपण मेलो असल्याचे नाटक करू या आणि असे झाल्यास एकूण संपूर्ण यंत्रणा कशी काम करते, त्याचे एक ‘मॉक ड्रिल’ करू या. विचार करून पडून राहिलो. साधारण 10-25 मिनिटांनी मला प}ीच्या हालचालीचा अनुभव आला. तिचे शब्द ऐकू आले की, ‘अरे ये अभी तक उठे नहीं’, ती किचनमध्ये गेल्याचे लक्षात येताच माहीत होतं की ती आता माङयासाठी चहा करून आणेल आणि पाच मिनिटांनी बेडरूममध्ये येण्याचा आणि चहाचा सुगंधसुद्धा आला पण मॉक ड्रिलचा निर्धार पक्का केला होता. म्हणून डोळे बंद करून पडून राहिलो. तिने चहाचा कप बेडच्या साईड टेबलवर ठेवल्याचा आवाज आला आणि तिचे ‘चाय रखी है’ हे शब्द ऐकू आले. पण तरी मी डोळे बंद करून झोपेतच चहाच्या तलफवर नियंत्रण ठेवून पडून राहिलो. तिने बेडरूमचा पडदा उघडत परत ‘चाय रखी है’ म्हणून हाक दिली. पण मी पडून राहिलो. तिने माझा हात धरून हलवला तरी मी स्वत: काही हालचाल केली नाही. तिने परत माझा हाथ धरून मला हलवलं. या वेळेला परत मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मला तिच्या चिंतेची जाणीव होत होती आणि ती करत असलेल्या व्यवहाराबद्दल मनात येत होतं. वाटले ही ‘मॉक ड्रिल’ पूर्ण होऊ दे. इतक्यात ड्रायव्हर आत येण्याचे आणि ‘गाडीची चाबी घेण्याचा आवाज आला, बायको मला हलवतच होती. पण मी श्वास रोखून पडून राहिलो आणि तिचे हलवणे बंद झाला की, मधूनच श्वास घेऊन घेत होतो. तिने ड्रायव्हरला हाक मारली. ‘संजय, जरा देखो तो ये उठ नही रहें है, ड्रायव्हर आला त्याने माझा हाथ धरून पाहिला, म्हणे शरीर तर गरम आहे, त्यानेसुद्धा हाक मारायला सुरुवात केली आणि हाता -पायाचे तळवे चोळायला लागला, बायको बडबडत होती, ‘ऐसा तो पहले कभी नही हुआ’ इतक्यात ड्रायव्हरने सल्ला दिला. ‘थांबा, कांदा आणतो. त्याने किचनमधून कांदा आणला. तो वास सहन होत नव्हता. त्या दोघांना होत असलेल्या बेचैनीची जाणीव होती आणि स्वत:बद्दल ‘गिल्टी’ वाटायला लागली. बरं झालं की तिनं माङया छातीवर तिचं डोकं ठेवून रडायला सुरुवात केली नाही. नाही तर पडोसन पिक्चरच्या अंतिम दृश्यामधील सुनील दत्त यांच्या नाकात सायरा बानोच्या गेलेल्या केसांमुळे येत असलेल्या शिंकांसारखं दृश्य खरं झालं असतं. कारण मला वाचवा, मला कुणी मुकरीसारखा मित्र नव्हता. इतक्यात ड्रायव्हर पळत जाऊन शेजारच्या हॉस्पिटलमधून डॉक्टरीन बाईला बोलवून आणले. त्यांनी बायकोला विचारले, ‘अंकल को शुगर है क्या? बायको म्हणाली ‘हो’, तिने बोटाला ‘प्रिक’ करून शुगर चेक केली. म्हणाली, ‘पैतालीस’. आता माङो कान जणू उभे राहिले. विचार केला, 45 कशी काय शक्य आहे.बहुतेक डॉक्टरची रीडिंग चुकत असेल. 9 ला 4 पाहत असेल. तिनी बी.पी. चेक केला. तो होता 130/90 होता, नेहमी तेवढाच असतो. मला वाटलं आता नाटकावर पडदा टाकायला हवा. घरची मंडळी काही नाटकाची प्रेक्षक नाही आणि मीसुद्धा आनंद पिक्चरचा राजेश खन्नासारखे नाटक करायला नको. नाही तर गमतीचा केलेल्या या मृत्यूचे ‘मॉक ड्रिल’ने तशीच परिस्थिती व्हायची.ड्रायव्हरने केव्हा खासगी दवाखान्यातील डॉ.सुनील पाटील यांना केव्हा फोन केला. मलाहीे कळलं नाही. तोसुद्धा लगेच धडकला होता. मग मी नाटकाला पडदा टाकत, ‘मै कहाँ हँू’च्या अंदाजाने डोळे उघडत सर्वाना समोर पाहून ‘आप लोग सब यहाँ कैसे? डॉक्टरीन बाईला विचारलं आप कौन? तिने आपली ओळख दिल्यानंतर विचारले, आप यहाँ कैसे? अंकल आपला शुगर लेवल बहुत गिर गया था, रात को क्या खाया था? मी सांगितले, ‘काल एकादशी होती, मी तर काही उपवास करत नाही. तरी प}ीने दिलेली भगर खाल्ल्याचे सांगितले. बायकोने लगेच मान हलविली. तिचा चेह:यावर पराठय़ाऐवजी बळजबरी भगर खाऊ घालण्याचा पश्चाताप जाणवत होता. मी म्हटलं आता नाटकाचा समारोप झाल्यानंतर काही न बोललेलंच बरं, पण तरी सुनीलच्या आग्रहाने एक कप चहा घेतल्यानंतर त्याच्यासोबत दवाखान्यात जावेच लागले. तिथे रँडम शुगर, बी.पी. सर्व नॉर्मल निघाले. ई.सी.जी. काढला. तोपण नॉर्मल होता. मी तेथून घरी आलो. गुपचूप आंघोळ केली आणि कार्यालयात आलो. मी केलेल्या नाटकाबद्दल थोडा पश्चाताप अवश्य आहे पण काही गोष्टींच्या या ‘मॉक ड्रिल’ मध्ये समाधान झालं की ‘द सिस्टिम वर्कड परफेक्टली राईट इन इमर्जेसी. माङया मागे एवढी मोठी यंत्रणा आहे, प्रेम करणारी नातलग आहे पण माङयासारखे इतर एकाकी जीवन जगणारा, तसे ज्येष्ठांचे काय होत असेल, म्हणून हे गुपित उघड करीत आहे, ते काही मार्मिक कथानक म्हणून नव्हे. - दिलीप चौबे
मृत्यूची ‘मॉक ड्रिल’
By admin | Published: April 23, 2017 1:48 PM